दिनो मोरियाने ‘तांडव’साठी तयारी करताना केला चित्रपटातील ‘प्रोफेसर्स चा अभ्यास

उत्तम भूमिका व वास्तववादी अभिनयासाठी ओळखला जाणारा दिनो मोरिया आगामी अमेझॉन ओरिजिनल सीरिज ‘तांडव’च्या अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणा-या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. दिनो यात राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाची भूमिका करताना दिसेल. या व्यक्तिरेखेसाठी केलेली तयारी आणि हा शो निवडण्यामागील कारण यांबाबत त्याने अलीकडेच बरेच काही सांगितले. तो म्हणाला, “कॅमे-यापुढे येण्यापूर्वीच माझ्या भूमिकेची उत्तम तयारी करायला मला आवडते, जेणेकरून मी भूमिका उत्कृष्टरित्या निभावू शकेन. ‘तांडव’मध्ये मी एका राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाची भूमिका केली आहे आणि म्हणून मी प्राध्यापकांच्या व्यक्तिरेखा असलेले बरेच चित्रपट बघितले, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास केला.”

तांडवमध्ये काम करण्याच्या निर्णयाबद्दल दिनो म्हणाला, “मी बराच काळ स्क्रीनपासून दूर होतो, कारण माझ्या मते मला चांगल्या ऑफर्स येत नव्हत्या. अभिनय हे माझे पहिले प्रेम आहे आणि मला चांगली भूमिका मिळाली तर ती संधी मी कधीच सोडणार नाही. मला जेव्हा ‘तांडव’ची ऑफर आली आणि पहिल्या वाचनातच मला कथानक खूप आवडले, तेव्हा मला अली अब्बास जफर यांच्यासोबत काम करण्याची संधी अजिबात सोडायची नव्हती. या शोमध्ये अनेक अष्टपैलू कलाकार आहेत. मला वाटते की, तांडवसारखी संधी आयुष्यात क्वचितच मिळते आणि म्हणूनच मी ती संधी घेतली. हा भारतातील पहिला राजकीय थरारपट असेल. ‘तांडव हे शीर्षकही अत्यंत चपखल आहे, कारण यात प्रत्येकजण आपल्या लाभासाठी दुस-याचे पाय खेचत आहे. हे कथानक वळणांनी आणि धक्क्यांनी भरलेले आहे. राजकीय तांडव या कथेच्या पार्श्वभूमीला असले तरी यात नातेसंबंधांतील जटीलताही दाखवली जाणार आहे.

Amazon Prime Video's new web series Tandav poster

त्यामुळे ज्यांना राजकारणात फारसा रस नाही, त्यांनाही हा शो बघायला खूप आवडेल.” बहुप्रतिक्षित राजकीय थरारनाट्य अमेझॉन ओरिजिनल सीरिज तांडव १५ जानेवारी २०२१ रोजी भारतात आणि २००हून अधिक देश-प्रदेशात, केवळ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर, प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची निर्मिती असलेल्या या ९ भागांच्या राजकीय नाट्यामध्ये दमदार कलावंतांची फौज आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तुर, मोहम्मद झीशान अय्युब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनुप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागरानी आदींच्या भूमिका यात आहेत.

पहा तांडव चे ट्रेलर – 

 

Website | + posts

Leave a comment