आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Unpaused: Naya Safar’ new season on Prime Video from 21st January. प्राइम व्हिडिओने आज ‘अनपॉज्ड- नया सफर’ या अँथॉलॉजीच्या 21 जानेवारी पासून जगभरातील २४० देशांत प्रीमियर होणार असल्याचे जाहीर केले.

२०२० मध्ये आलेल्या अनपॉज्डच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर या अमेझॉन ओरिजनल अँथॉलॉजीच्या सिक्वेलमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्म्समधून महामारीमुळे आपल्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने, आपल्याशा वाटणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या असून त्याचबरोबर नव्या वर्षाचे स्वागत करत असताना कशाप्रकारे सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करायला हवा हे सांगण्यात आले आहे.

दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला ‘अनपॉज्ड- नया सफर’ आपल्याला काळोख्या रात्रींनंतर येणाऱ्या पहाटेच्या प्रकाशाची जाणीव करून देतो. प्रेम आणि सकारात्मकतेनं परिपूर्ण असलेली ही अँथॉलॉजी आपल्या नव्या वर्षाच्या सुरुवातीसह नव्या प्रारंभाचा स्वीकार करण्याची विनंती करते. या अँथॉलॉजीमध्ये पुढील शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे.

• तीन तिगाडा – रूचित अरूण दिग्दर्शित – सकीब सालेम, आशिष वर्मा आणि सॅम मोहन अभिनित

• द कपल – नुपूर अस्थाना दिग्दर्शित – श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशी पेन्युली अभिनित

• गोंद के लड्डू – शिखा मकान दिग्दर्शित – दर्शना राजेंद्रन, अक्षवीर सिंग सरन आणि नीना कुलकर्णी अभिनित

• वॉर रूम – दिग्दर्शित अयप्पा केएम – गीतांजली कुलकर्णी, रसिका अगाशे, पुरानंद वांधेकर आणि शर्वरी देशपांडे अभिनित

• वैकुंठ – नागराज मंजुळे दिग्दर्शित – अर्जुन करचे, हनुमंत भंडारी अभिनित

अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजनल्स विभागाच्या प्रमुख अर्पणा पुरोहित म्हणाल्या, ‘सध्याच्या आव्हानात्मक काळात आशा, सकारात्मकता आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टींचा हृदयस्पर्शी संग्रह असलेल्या अनपॉज्ड- नया सफरसह या वर्षातल्या ओरिजनल्सची सुरुवात करणं खूप खास आहे. ही सीरीज देशातील स्वतंत्र आणि खिळवून ठेवणाऱ्या सिनेमाविषयक गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्याची आमची बांधिलकी परत अधोरेखित करणारी आहे.’ 

ओटीटी जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.