अल्ट बालाजी आणि झी यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी ‘द मॅरेड वूमन’ प्रोजेक्टची घोषणा केली आहे, जो लेखक मंजू कपूरच्या बेस्टसेलर कादंबरी ‘अ मॅरेड वूमन’ वर आधारित आहे. हा शो म्हणजे एक प्रगतीशील आणि अग्रगण्य कंटेंटचे उदाहरण आहे ज्याने घरगुती प्रवाहाचा वारसा देखील अबाधित ठेवला आहे. आणि नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला आहे जो केवळ आपल्या धारणाच तोडत नाही तर आपल्या मनात वारंवार एक प्रश्न निर्माण करतो- प्रेम म्हणजे काय?

टीजर हा प्रश्न उपस्थित करतो, जो आपण आपल्याला योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत स्वतःला विचारत असतो. आस्था आणि पिप्लिका यांच्या काही छोट्या प्रसंगांतून निर्माते तिला तिच्या अपारंपरिक आणि पारंपारिक प्रेमाबद्दल विचार करण्यास भाग पाडतात.

‘अ मॅरीड वूमन’ हे महिलांविषयी आणि समाजाने महिलांवर लादलेल्या अटींबद्दल आणि त्यांनी त्यांच्यातील स्व शोधण्यावर आधारित एक शहरी नात्यांचे नाट्य असलेले कथानक आहे. यामध्ये रिधी डोगरा आणि मोनिका डोगरा यांच्या मध्यवर्ती भूमिका असून इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास आहुजा इत्यादी उल्लेखनीय कलाकारांचा समावेश आहे.

अशी एक प्रेरणादायक कहाणी पडद्यावर जीवंत करताना, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने या शोच्या पोस्टरसोबत एक हृदयंगम व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे, ज्यात प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर देखील दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, त्या एक लेखक म्हणून त्यांच्या प्रवासाविषयी सांगतानाच, नव्वदच्या दशकात विवाहित महिलांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे ज्या 2021 मध्ये देखील तंतोतंत लागू पडतात. यासोबतच, रिधी डोगरा आणि मोनिका डोगरा असलेले आकर्षक पोस्टर शोच्या भावना आणि त्याच्या कथनाचे उत्तम वर्णन करताना दिसते.

‘द मॅरिड वूमन’ 8 मार्चपासून अल्ट बालाजी आणि झी5 वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.