झी 5 ने केली ‘सनफ्लॉवर’वेब सीरीजसाठी स्टार-स्टडेड सपोर्टिंग कास्टची घोषणा

झी 5 ने त्याच्या आगामी ओरिजिनल ‘सनफ्लॉवर’वेब सीरीजसाठी स्टार-स्टडेड सपोर्टिंग कास्टची घोषणा केली आहे, ही एक अनोखी प्रसंगनिष्ठ क्राईम- कॉमेडी आहे. ‘सनफ्लॉवर’ सोसायटीच्या रहिवाशांमध्ये समाविष्ट आहेत: गिरीश कुलकर्णी, शोनाली नागरानी, रणवीर शौरी, मुकुल चड्ढा, सोनल झा, राधा भट्ट, आशिष विद्यार्थी, सलोनी खन्ना आणि आश्विन कौशल. 

Girish Kulkarni in Sunflower
Girish Kulkarni in Sunflower

शैली आणि भाषांमधील उत्कृष्ट ओरिजिनल प्रीमियर सादर करत ओटीटी दिग्गज ठरलेल्या झी 5 ने अलीकडेच एका अनोख्या प्रसंगनिष्ठ क्राईम- कॉमेडी शैलीच्या वेब सीरिजची घोषणा केली होती ज्यात या ‘सनफ्लॉवर’ सोसायटीचे नेतृत्त्व सुनील ग्रोव्हर करणार आहे.

Ashish Vidyarthi in Sunflower
Ashish Vidyarthi in Sunflower

आता, या मंचाने ‘सनफ्लॉवर’ सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांची, सहकलाकारांची घोषणा केली आहे, ज्यात मुकुल चड्ढा आणि राधा भट्ट असणार आहेत. श्री. आणि श्रीमती आहुजा, आशिष विद्यार्थी असणार आहे. दिलीप अय्यर आणि सोनल झा त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे, रणवीर शौरी इंस्पेक्टर दिगेंद्रच्या भूमिकेत असणार असून गिरीश कुलकर्णी असणार आहे तांबे. अश्विन कौशल राज कपूर आणि सोनाली नागरानी श्रीमती राज कपूर तसेच सलोनी खन्ना यांचा समावेश असणार आहे.

Ranvir Shorey in Sunflower
Ranvir Shorey in Sunflower

‘सनफ्लॉवर’चे सह-दिग्दर्शक विकास बहल आणि राहुल सेनगुप्ता याविषयी बोलताना म्हणाले की, “‘सनफ्लॉवर’च्या प्रारंभीच्या प्रक्रियेत कास्टिंग हा सर्वात महत्त्वाचा आणि मजेदार भाग होता. आम्हाला माहित होतं की हा प्लॉट व्यक्तिरेखा यांच्यामुळेच महत्त्वाचा आहे, त्यामुळे योग्य व्यक्तीनेच योग्य व्यक्तिरेखा निभावणे आवश्यक आणि तितकेच महत्वाचे होते. समीर, आशिष, गिरीश, रणवीर, मुकुल, शोनाली, सोनल यांच्यापासून राधा, अश्विन, सलोनी, दयाना या सर्वच प्रतिभावंत कलाकारांनी एकत्र येऊन एक विलक्षण परंतु अनोख्या अशा पात्रांचा ओघ तयार केला आहे जे मालिका एकत्र आणतात. “

Shonali Nagrani in Sunflower
Shonali Nagrani in Sunflower

‘सनफ्लॉवर’ ही गुन्हेगारी-विनोदी वेब मालिका असून ‘सनफ्लॉवर’ नावाच्या मुंबईतील मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थेची कहाणी आहे. थरारक, विनोदी आणि नाट्य यातून फुलणारी ही कथा गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या पात्रांच्या आसपास फिरणारी असून ही कथा पाहणाऱ्या प्रत्येकाला रोलर-कोस्टर राइडमध्ये बसल्याचा अनुभव देते.

रिलायन्स एंटरटेनमेंट अँड गुड कंपनी निर्मित ही मालिका विकास बहल यांनी लिहिली असून राहुल सेनगुप्ता व विकास बहल यांनी सह-दिग्दर्शित केली आहे. 

‘सनफ्लॉवर’, या झी 5 ओरिजनलचा प्रीमियर एप्रिल 2021 मध्ये होणार आहे

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.