अभिनेता सोहम शहाने ‘महारानी’ (Maharani) मधील आपल्या भूमिकेविषयी व्यक्त केल्या भावना.

सोहम शहा एक असा अभिनेता आहे, ज्याने पडद्यावरील उत्तम अभिनयाने आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध केली असून व्यक्तिरेखेशी समरस होण्याची त्याची हातोटी प्रशंसनीय आहे. शिप ऑफ थीसस, तुम्बाड आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महारानी’मधील त्याचे काम कौतुकास्पद आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिका एकमेकांहून खूप भिन्न असून हे त्याच्या उत्तम अभिनय क्षमतेबाबत खूप काही सांगून जाते. (Actor Sohum Shah as Bhima Bharati in Maharani on SonyLiv)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीरिजमध्ये, अभिनेता एका बिहारी राजनेत्याच्या आपल्या व्यक्तिरेखेबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. सोहम म्हणतो की, “मी ‘महारानी’च्या प्रदर्शनाबाबत खूपच उत्साहित आहे. ही खरोखरच एक बहुप्रतीक्षित रिलीज आहे. यातील भीमा भारतीची भूमिका साकारत असताना माझ्यातली नवीन बाजू समोर आली आहे, ज्याबद्दल मी स्वतःच अनभिज्ञ होतो. आणि हे केवळ सुभाष सरांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. ‘महारानी’मध्ये देखील मी काहीतरी नवे करण्याचा माझा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल.”

या भूमिकेसाठी, सोहमने केवळ योग्य भाषा आणि ती बोलण्याची पद्धतच शिकला नाही तर व्यक्तिरेखेसारखे दिसण्यासाठी स्वतःमध्ये शारीरिक बदल देखील केले आहेत. काही किलो वजन वाढवले असून व्यक्तिरेखेला शोभेशा करारी मिशा देखील वाढवल्या आहेत. एकूणच या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी अभिनेत्याच्या या विकासाला पसंती दिली असून सुरुवातीपासूनच तो प्रभावशाली राहिला आहे.

‘महारानी’मधील त्याचा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला असून अभिनेत्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होणार आहे. सोहम शहा एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी ‘फॉलन’मध्ये दिसणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.