आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Prime Video announces its first law-based series, Guilty Minds श्रिया पिळगावकर आणि वरूण मित्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेली पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ ची घोषणा प्राईम व्हिडीओने आज केली. निर्माती, दिग्दर्शिका शेफाली भूषण आणि जयंत दिगंबर सामळकर यांनी सहदिग्दर्शन केलेली ही कायदा सुव्यवस्थेवर आधारित मालिका दोन महत्वकांक्षी वकिलांचा प्रवास दाखवते.

यामधील एक अतिशय सरळमार्गी प्रामाणिक वकील आहे तर दुसरा एका प्रतिष्ठित कायदे कंपनीमध्ये काम करणारा परंतु काळे धंदे करणारा वकील आहे. या मालिकेमध्ये नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेन्जामिन गिलानी, वीरेंद्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सात्रुपा यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून करिष्मा तन्ना, शक्ती कपूर आणि सुचित्रा कृष्णमूर्ती हे पाहुणे कलाकार आहेत.

दोन तात्विक दृष्ट्या भिन्न वकिलांच्या या न्यायालयीन नाट्याचे करण ग्रोव्हर हे निर्माते आहेत व अंतरा बॅनर्जी आणि नावेद फारुकी हे सहनिर्माते आहेत. भारतात व २४० अन्य देशा- प्रदेशांमध्ये राहणारे प्राईम व्हिडीओ चे सभासद २२ एप्रिल २०२२ पासून या अमेझॉन ओरिजिनल सिरीजचा आनंद घेऊ शकणार आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment