मार्च महिना सुरु झाला, की सगळ्यांना वेध लागतात ते महिला दिनाचे. महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा जणू सणच. प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाला, तिच्या कर्तृत्वाला एक कृतज्ञता पूर्वक सलाम करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन. महिला दिन सर्वच स्तरावर, सर्वच क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याला मनोरंजनसृष्टी देखील अपवाद नाही. याच महिला दिनाचे औचित्य साधून मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या नायिकांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला.

planet marathi womens day celebration

प्लॅनेट मराठीचाच एक भाग असणाऱ्या प्लॅनेट टॅलेंटने यावर्षीचा महिला दिन साजरा केला. या वेळी तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, गायत्री दातार, भार्गवी चिरमुले आदी अभिनेत्री उपस्थित होत्या. याशिवाय प्लॅनेट टॅलेंटमध्ये अमृता खानविलकर, सायली संजीव, शिवानी बावकर यांचाही समावेश आहे. या वेळी उपस्थित तारकांनी मीडियासोबत गप्पाटप्पा, आपले काही अनुभव शेअर करत, गेम्स खेळत, धमाल मजा मस्ती केली. काहींनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्रियांबाबतचे मनोगतही व्यक्त केले. या वेळी सगळ्या अभिनेत्रींनी एकत्र केकही कापला.

————————————————————————–

हेही वाचा- प्लॅनेट मराठीची नवी वेबसिरीज ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू-http://navrgdhu.us.tempcloudsite.com/ott-platforms/jobless/ 

————————————————————————–

या कार्यक्रमाला प्लँनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर देखील उपस्थित होते. या आयोजनाबद्दल अक्षय बर्दापूरकर म्हणाले, “खरं तर महिला दिन हा केवळ एकच दिवस साजरा न करता रोजच केला पाहिजे. प्रत्येक महिलेला, मग अगदी ती लहान मुलगी असो, तिला आदराने वागवणे, तिचा सन्मान करणे म्हणजेच महिला दिन. आज महिला दिनानिमित्ताने प्लॅनेट मराठी, प्लॅनेट टॅलेंटच्या परिवारातील महिला, ज्या आमच्यासाठी खूप खास आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, त्यांचे लाड पुरवण्याच्या उद्देशाने आम्हाला काही विशेष करायचे होते आणि त्यासाठीच या खास सेलिब्रेशनचे आयोजन.‘’

planet marathi womens day celebration

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.