अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओचा नुकताच रिलीज झालेला मराठी चित्रपट ‘पिकासो’ त्याच्या घोषणेपासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांच्या खास कौतुकाचा विषय ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये ‘पिकासो’ला विशेष उल्लेखनीय श्रेणीत गौरवण्यात आले.

बाप आणि मुलाच्या हळूवार नात्याला तळकोकणातील दशावतार या पारंपारिक कलाप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या चित्रपटाने स्थानिक आणि जागतिक पातळीवर अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. या चित्रपटातून दशावतार हा कलाप्रकार ज्या उत्कृष्ट पद्धतीने सादर करण्यात आला आहे, त्याबाबत काही उल्लेखनीय टिप्पण्या पुढील प्रमाणे,


 

प्लॅटून वन फिल्म्स अँड एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट या बॅनरखाली शिलादित्य बोरा निर्मित हा चित्रपट एका लहान मुलाच्या स्वप्नांना अतिशय प्रभावीपणे सादर करतो आणि हेच मुख्य कारण आहे जे प्रेक्षकांना भावते आणि जे एका चांगल्या चित्रपटाचे लक्षण वाटते आणि त्यामुळेच ‘पिकासो’ हा चित्रपट सातत्याने लोकांची अंतःकरणे जिंकत आला आहे.

‘पिकासो’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बाल कलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्लाटून वन फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली शिलादित्य बोरा निर्मित, ‘पिकासो’चे दिग्दर्शन आणि कथा अभिजीत मोहन वारंग यांनी लिहिली आहे.

 

Website | + posts

Leave a comment