इरॉस नाऊ या ग्लोबल एंटरटेनमेंट कंपनी आज ‘वन्स मोअर’ नावाची रोमँटिक कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत ज्यात अंजली आणि कपिल ही जोडी त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार आहेत. पण धकाधकीचं जीवन, धावपळ यामुळे अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे दोघेही वेगळं होण्याचा निर्णय घेतात. पण भूतकाळातील काही गोष्टी अशाप्रकारे उलगडत जातात की त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाते.
नरेश महादेव बिडकर दिग्दर्शित, वन्स मोअर, एक रोमँटिक कॉमेडी इरॉस नाऊवर ९ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. ही अनोखी कथा दोन भिन्न युगांवर आधारित असाधारण विषयावर प्रकाश टाकते. वेगवेगळ्या टाइमलाइनमध्ये दोन समांतर ट्रॅक असलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते रोहिणी हट्टंगडी, आशुतोष पत्की, धनश्री दळवी, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर , पूर्णिमा तळवलकर, नरेश बिडकर, सुशांत शेलार आणि विनोद पाटील यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. आजोबा आणि राणीच्या दोन पूर्णपणे भिन्न पात्रांमध्ये रोहिणी हट्टंगडी पाहताना पाहण्याची चाहत्यांना आनंद होईल. त्यांचे अभिनय कौशल्य आणि चित्रपटातील करिष्मा शेवटपर्यंत सर्वांना मंत्रमुग्ध करेल याची खात्री आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “वन्स मोअर हा प्रेक्षकांसाठी एक आगळा वेगळा अनुभव असणार आहे. हा चित्रपट माझ्या खूपच जवळचा आहे. कारण यात मी पूर्णपणे वेगळ्या दोन भूमिका साकारल्या आहेत. त्यात स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही पात्र आहेत. या चित्रपटामधून मी प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो त्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे.
९ फेब्रुवारी २०२१ रोजी वन्स मोअर पाहण्यासाठी ट्यूनइन करा इरॉस नाऊवर !