गेल्यावर्षी जगभर पसरलेल्या व अजूनही तळ ठोकून बसलेल्या महामारीमुळे डिजिटल माध्यमांचा फायदा झाला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी युट्युबसोबत हातमिळवणी केल्यामुळे दर्शकांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिजिटल माध्यमांची वाढत चालेली लोकप्रियता लक्षात घेऊन उद्योजक व निर्माते नरेंद्र फिरोदिया यांनी लेट्सअपच्या माध्यमातून ‘खास रे’ युट्युब वाहिनीमधील प्रमुख भागभांडवल विकत घेतले आहेत.

‘लेटसअप’ हे हायपर लोकल वर्नाक्युलर इंफोटेननमेंट एप्लिकेशन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, मनोरंजन व क्रीडाविषयक बातम्या पुरवण्याचे काम करते. हे ऍप वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. ह्या एप्लिकेशनला तीन दशलक्ष ग्राहकांनी सबस्क्राईब केले आहे. ‘खास रे’ ही डिजिटल एंटरटेनमेंट कंपनी असून विविध विनोदी व्हिडीओ, गाणी त्यांच्या वाहिनीवरून प्रसिद्ध केली जातात. 

सोलापूरमधील बार्शीच्या संजय श्रीधरने ‘खास रे टीव्ही’ची स्थापना केली. पुण्याला शिक्षण घेत असतानाच संजय वेडिंग फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी त्याची या माध्यमातील रुची वाढत गेली. त्यानंतर त्याने व्हिडीओ प्रॉडक्शनमध्ये संपूर्ण लक्ष घातले व महेश महामुनी, कृष्णा जानू या मित्रांसोबत मिळून ‘खास रे टीव्ही’ची स्थापना केली. 

‘काळानुसार युट्युब वाहिन्यांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे आणि की, ‘खास रे टीव्ही’ला इतर युट्युब वाहिन्यांप्रमाणे लोकप्रियता मिळवण्याची क्षमता आहे. प्रेक्षकांना चांगल्या दर्जाचे कंटेन्ट देण्याचा माझा मानस आहे.  या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कंन्टेट निर्माण करण्यासाठी मी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईन’ असे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले. ‘खास रे टिव्ही’ ह्या पुढे वेब सिरीज, चित्रपट आणि अजून चांगले दर्जेदार कन्टेन्ट देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नरेंद्र फिरोदिया यांचे मनोरंजन विश्वातील हे उपक्रम कोणते असतील हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.