आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Narco Queen Shashikala Patankar’s story to be brought to the screen by Samit Kakkad ‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली या वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड आणि संजय गुप्ता सांभाळणार आहेत. समित यांनी आजवरच्या आपल्या चित्रपटांमधून खऱ्या मुंबईचं दर्शन घडवलं आहे.

चित्रपट व्यवसायातील सुमारे दोन दशकांच्या आपल्या प्रवासात, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक समित कक्कड यांनी पडद्यामागे स्थिरावत दिग्दर्शकाच्या रूपात आपली एक वेगळी इमेज तयार करण्यात यश मिळवलं आहे. ‘आश्चर्यचकित’, ‘हाफ तिकीट’, ‘आयना का बायना’ या चित्रपटांसोबतच ‘इंदोरी इश्क’ हा वेब शो आणि सध्या निर्मिती प्रक्रियेत असलेल्या ‘धारावी बँक’मध्ये समित यांचं मुंबईवरील प्रेम हा कॅामन फॅक्टर पहायला मिळतो. वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवरील बायोपिकचं दिग्दर्शनही समित करत आहेत.

मुंबई शहराच्या प्रेमात असलेले समित म्हणाले की, “हे थोडंसं विचित्र वाटलं तरी मी किशोरवयीन असल्यापासून अनपेक्षितपणे यासारख्या विषयांकडे आकर्षित झालो होतो, तेव्हा मी कॉलेजमध्येही नव्हतो. तेव्हाही बार डान्सर्स, गुंड, पानवाले… प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टोरी होती जी तुमचे अनुभव समृद्ध करत असते. मुंबई शहराच्या या अंतरंगाने मला नेहमीच आकर्षित केलं आहे. आजही या कथा जणू सोन्याची खाण आहेत. आपल्याला फक्त आपले कान उघडे आणि पाय जमिनीवर ठेवावे लागतत. मी बऱ्याच वर्षांपासून बार डान्सर्स, गँगलीडर्स यांसारख्या समाजातील घटकांना फॉलो करत होतो. त्यामुळं जेव्हा मी माझं स्वतःचं कंटेंट तयार करू लागलो, तेव्हा माझ्या गाठीशी जमा झालेल्या अनुभवांना आपोआप वाचा फुटणं स्वाभाविक होतं.”

मागील काही दशकांपासून चित्रपट निर्मात्यांना मुंबई शहराच्या जडणघडणीतील विविध घटकांनी भुरळ घातली आहे, ज्यात या अंडरबेलीचाही समावेश आहे. मुंबईच्या अंडरबेलीनंच अधिक आकर्षित करण्याबाबत सविस्तरपणे सांगताना समित म्हणाले की, ‘इथे तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तिरेखा तुमची विचारसरणी कायमची बदलणारी ठरतील. वरवर पाहता खूपच झगमगीत दिसणाऱ्या या शहराच्या अंधाऱ्या वास्तवाने माझ्या मनात कुतूहल जागवलं. माझ्या आशयातील सर्व व्यक्तिरेखा, सेटिंग्ज आणि चित्रण वास्तविक अनुभवातून आलेलं आहे. स्वीटीच्या जीवनावर आधारित असलेली पुष्कराज आणि शशिकला पाटणकर यांच्या जीवनावरील कथा हे दोन्ही आकर्षक असून, आपल्या प्रेक्षकांना त्यांनी यापूर्वी न पाहिलेले या शहराचे पैलू दाखवणाऱ्या ठरतील.

ओटीटी जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment