असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतचं… मग कितीही नशीब नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तरीही. मात्र तुमच्या भविष्यात काय लिहूनठेवलंय, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता? तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपेक्षित अशी एमएक्स ओरिजनल सिरीज ‘समांतर’ आपला सिझन २ (Samantar Season 2) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. यात पुन्हा एकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) , सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’ सिझन २ विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता ‘समांतर’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Trailer of Samantar 2, MX Player Original Web Series Released Today) कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्मदुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.

सिझन २ बद्दल स्वप्नील जोशी म्हणतो, ”प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन ‘समांतर’ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचाअडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शो ने आपलंस केलंय. ‘समांतर’चा पहिला सिझन येऊन आता वर्ष उलटले असून मलामाहित आहे की, प्रेक्षक आता सिझन २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सिझन २ मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून यातहा प्रश्न उपस्थित होणार आहे, की जर तुम्हाला तुमचं भविष्य माहित असेल, तर ते बदलणे शक्य आहे का?”

सुदर्शन चक्रपाणीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज सांगतात, ”एक अभिनेता म्हणून माझ्या नव्या रुपाला सिझन १ मध्ये खूपचचांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक सुद्धा नवनवीन संकल्पना स्वीकारत आहेत, हे पाहून खूपच छान वाटतंय. एक अभिनेता म्हणून या अनोख्या कथानकाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. चक्रपाणीचे आयुष्य कुमारच्या जीवनाचे प्रतिबिंब होईल, की काही मनोरंजक वळणे घेत कुमारच्याउत्तरांच्या शोधाचे अनुसरण करत राहील ? हे सिझन २ पाहिल्यावरच कळेल.”

Tejaswini Pandit in Samantar Season 2
Tejaswini Pandit in Samantar Season 2

सिझन १ चे कुतूहलजनक कथानक म्हणजे कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्याकाळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सिझन २ मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाजरोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही या गूढ स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीनेआपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.

Sai Tamhankar in Samantar Season 2
Sai Tamhankar in Samantar Season 2

‘समांतर’ या थ्रिलर वेब शोचा हा सिझन मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना १ जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

Nitish Bhardwaj in Samantar Season 2
Nitish Bhardwaj in Samantar Season 2

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.