बहुचर्चित-वेब शो, ‘द मैरिड वुमन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकता कपूरने नुकतेच अजमेर शरीफ दर्ग्यावर आपल्या या वेब शोच्या यशासाठी प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतले. या वेळी तिच्यासोबत शोचे कलाकार रिद्धि डोगरा आणि मोनिका डोगरा देखील उपस्थित होत्या.

प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांची बेस्टसेलर कादंबरी ‘ए मैरिड वुमन’ वर आधारित, या शोच्या ट्रेलरने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. यशस्वी निर्माता एकता कपूरचा हा शो, जो महिला आणि त्यांची आवड निवड याच्याभोवती फिरतो, त्याबाबत विशेष उत्साहित आहे आणि या शोच्या प्रमोशन्ससाठी जयपुरच्या दौऱ्यावर आहे.

ekta kapoor at ajmer shariff
Ekta Kapoor at Ajmer Shariff

साहिर रज़ा यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘द मैरिड वुमन’ एक अरबन रिलेशनशिप ड्रामा असून स्त्रिया आणि समाजाने त्यांच्यावर लादलेली बंधने आणि स्व चा शोध याविषयी भाष्य करते. या शोमध्ये रिधि डोगरा आणि मोनिका डोगरा मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यासोबत इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास आहूजा यांसारखे नावाजलेले कलाकार देखील आहेत.

‘द मैरिड वुमन’ 8 मार्चपासून ऑल्ट बालाजी आणि ज़ी5 वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.