एखाद्या जखमेवर कोणी हळुवार फुंकर मारली, तर ती जखम भरून येण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. अशीच हळुवार फुंकर कोणी आपल्या मनाच्या जखमेवर मारली तर? त्यावेळी आपल्या मनात ‘हिलींग इज ब्युटीफुल’ अशीच भावना येईल. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित ‘जून’ हा चित्रपट ३० जून रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’,’अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी’वर प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नेहा आणि सिद्धार्थची एक वेगळीच केमिस्ट्री यात पाहायला मिळाली.  (Marathi film June will be releasing on Planet Marathi OTT on 30th June) 

हेही वाचा- ‘प्लॅनेट मराठी’वर ३० जूनला झळकणार ‘जून’, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू निर्मित या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे.

 

Website | + posts

Leave a comment