“झी बरोबर माझे डिजिटल डेब्यू ही माझी घरवापसी”-कुणाल कोहली

झी5 सोबत दिग्दर्शनात पुनरागमन करणारे ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ चे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी साधला संवाद….

झी5 या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचा आगामी सिनेमा ‘लाहोर कॉन्फिडेंशल’ हा त्याची  प्रतिभाशाली स्टारकास्टची घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. ही स्टारकास्ट  ‘लाहोर कॉन्फिडेंशल’ च्या भक्कम आणि रंजक कथानकाला साजेशी अशी आहे. 

‘लाहोर कॉन्फिडेंशन’ या सिनेमात रिचा चड्ढा, अरुणोदय सिंग आणि करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत आहेत. कुणाल कोहली दिग्दर्शित आणि जार फिल्म्स निर्मित हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुणाल कोहली यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट असणार आहे.

lahore confidential movie poster

ओटीटी दिग्दर्शनातील पदार्पण आणि त्याचा अनुभव सांगत कुणाल कोहली म्हणाले, “झी 5 सोबत हा माझा पहिला उपक्रम जरी असला तरी मी झी टीव्हीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. जेव्हा झी टीव्ही सुरु झाला तेंव्हा माझे शोज सुरुवातीच्या काही शोज पैकी एक होते व झी टीव्ही सोबत सुरुवातीपासून काम केलेल्यांपैकी मी एक आहे. मी माझ्या कारकीर्दीची सुरूवातच सॅटेलाईट टीव्ही म्हणजेच झी टीव्हीसोबत केली आहे. आता झी5 सह डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करताना मला खूप आनंद झाला आहे. मी म्हणेन की झी टीव्हीद्वारे मी करमणूक क्षेत्रात पदार्पण केले असल्याने ही एक प्रकारे माझी घरवापसी आहे” 

कुणाल कोहली पुढे म्हणाले की “हा चित्रपट १९० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे हे जाणल्यावर मला खरंच आश्चर्य वाटले व  या गोष्टीमुळे आपोआपच तुमच्यावर चांगले काम करण्याचा एक दबाव असतो कारण आता बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यांच्यात प्रचंड स्पर्धा आहे, आणि प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. झी5 मध्येही बरेच चांगले शो आणि बरेच चांगले चित्रपट आहेत ज्यात तुम्हाला स्वत: ला सिद्ध करावे लागते. हे खूपच मनोरंजक आणि मजेदार आहे “

लाहोर कॉन्फिडेंशल ४ फेब्रुवारी २०२१ रोजी झी5 वर रिलीज झाला आहे. 

Website | + posts

Leave a comment