आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Katyan Kato is a Malvani Song music video recently launched on Saptasur Music’s YouTube channel. मालवणी भाषा ऐकायला अतिशय गोड वाटते.. पण मराठी चित्रपटात किंवा म्युझिक अल्बममध्ये मालवणी गाणी आतापर्यंत अगदीच मोजकी झाली आहेत. साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिक अँड एचडी प्रॉडक्शनतर्फे म्युझिक अल्बम क्षेत्रात वेगळा प्रयोग करत असून, “काट्यान् काटो…” या मालवणी म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, अमृता देवरुखकर आणि वरद धोत्रे ही फ्रेश जोडी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. 

सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर काट्यान काटो हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला  आहे. ज्येष्ठ संगीतकार वसंत मोरे यांच्या संगीताला हेमंत धुरी यांनी स्वरसाज दिला आहे. गीतलेखन सोनाली जेम्स साडणकर यांचं आहे, तर मुग्धा नारकर यांनी हे गीत गायलं आहे. विवेक शुक्ला यांनी सिनेमॅटोग्राफी, राधिका भट यांनी कोरिओग्राफी तर  चिन्मय शिवलकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. 

साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकनं आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मराठी म्युझिक अल्बम क्षेत्रात नवा ट्रेंड निर्माण केला आहे. वेगवेगळ्या धाटणीची गाणी आतापर्यंत या चॅनलवर लाँच करण्यात आली आहेत. नव्या दमाच्या कलावंतांना या म्युझिक व्हिडिओतून संधी मिळाली आहे. त्यात आता “काट्यान काटो” या मालवणी म्युझिक व्हिडिओची भर पडणार आहे. काट्यान काटो हे अतिशय वेगळं गाणं आहे. तसंच नितांत सुंदर परिसरात चित्रीत केलेला म्युझिक व्हिडिओ प्रत्येक प्रेक्षकाला आनंददायी अनुभव देईल यात शंका नाही.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.