जर आपण तिच्याबद्दल आतापर्यंत ऐकले नसेल तर आपण निश्चितच वेगळ्या जगात जगतो आहोत. असो, आपण बोलत आहोत समांथा अक्केनेनी (Samantha Akkineni), जी तमिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रस्थापित अभिनेत्री आहे. आपली सुंदरता, उत्कृष्ट अभिनय कौशल्य, निर्दोष स्क्रीन प्रेजेन्स आणि अतुलनीय बहुमुखी प्रतिभा यामुळे तिने दक्षिणेत प्रत्येकाची मने जिंकली आहेत. आणि आता, मुख्य प्रवाहातील ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) च्या नव्या सीझनमध्ये ती आपला डिजिटल डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. नव्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारीचा सूड घेणारा राजीची भूमिका साकारणारी सामंथा अक्किनेनी, तिच्याशी संबंधित 5 मनोरंजक तथ्ये…(Interesting Facts About ‘The Family Man’ Actress Samantha Akkineni)

वास्तव आयुष्यातील मानवतावादी दृष्टीकोन
समंथा एक उत्कृष्ट कलाकार असण्यासोबतच एक एनजीओ देखील चालवते ज्याची सुरुवात तिने 2012ला केली होती. ही एक स्वयंसेवी संस्था असून स्त्रिया आणि लहान मुलांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. समंथाचा मानवतेवर विश्वास असून समाजाला उत्तम बनवण्यासाठी कार्य करत आहे. ती आपली संस्था चालवण्यासोबतच स्त्रिया आणि मुलांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या अन्य स्वयंसेवी संस्थांना देखील मदत करते. यासोबतच, रस्त्यावरील भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या एनजीओंना देखील सहकार्य करते.

शिकण्याची आवड आणि भूमिकेत 100% देण्यासाठी उत्साही
‘द फॅमिली मॅन’मधील नव्या सीजनमध्ये समंथा सादर करत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव राजी है, जी श्रीकांतची प्रतिद्वंद्वी असून एका गारमेंट फॅक्ट्रीमध्ये काम करते. भूमिकेला यथासंभव वास्तववादी बनवण्यासाठी तिने एका खऱ्याखुऱ्या गारमेंट फॅक्ट्रीमध्ये शिवणकला शिकली असून आपली भूमिका निभावण्यासाठी तिथल्या कारागिरांची देखील मदत घेतली.

इंटेन्स फिजिकल ट्रेनिंग
समंथाने ‘राजी’च्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी आणि ती खरी वाटण्यासाठी गहन आणि कठोर शारीरिक प्रशिक्षण घेतले आहे आणि एका कठीण ट्रांसफॉर्मेशनमधून गेली आहे. तिने प्रत्येक दिवशी कितीतरी तास फिजिकल ट्रेनिंग घेतले आहे आणि या सिरीजमधील या भूमिकेसाठी खरोखरच आपले रक्त आटवले असून घाम गाळला आहे.

Samantha Akkineni in The Family Man
Samantha Akkineni in The Family Man

मेथड एक्टर
‘राजी’च्या व्यक्तिरेखेला समजण्यासाठी आणि ती प्रामाणिक आपल्यात उतरवण्यासाठी, सामंथाने खूप रिसर्च केला. तिने तीन दिवस स्वत:ला खोलीत बंद करून घेतले आणि राजी च्या व्यक्तिरेखेत मिसळण्यासाठी अनेक माहितीपट पाहिले.

ओटीटीवर डेब्यू करण्यासोबतच साकारणार धमाकेदार अॅक्शन सीन
‘द फॅमिली मॅन’मधील समंथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात पहायला मिळेल. ही तिची पहिली ग्लॅमर नसलेली भूमिका असून यात ती हार्डकोर अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि आपल्या शत्रूशी लढण्यासाठी कठोर पाउले उचलताना दिसणार आहे. समन्थाच्या अभिनय कारकीर्दीत प्रथमच ती बंदूक हाताळताना दिसणार आहे.

Website | + posts

Leave a comment