“इंडिया के तुफान”- भारतातील सर्वांचे आवडते बॉक्सर पहायला मिळणार असून तोडून टाकच्या व्हीडीओची पटकथा आणि दिग्दर्शन नवझार इराणी यांचे असून वॉकअबाऊट फिल्मसची निर्मिती आहे. (Featuring ‘India Ke Toofaan’ -decorated boxers from across India, the video for Todun Taak is scripted and directed by Navzar Eranee)

फरहान अख्तर अभिनीत धडाकेबाज ट्रेलरने प्रेक्षकांना आकर्षित केल्यानंतर आज अमेझॉन प्राईम व्हीडीओने आणखी एक परिणामकारक सिनेगीत – तोडून टाक प्रसिद्ध केले. बुलंद आवाजातील हा म्युझिक व्हीडीओ प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. एखाद्याच्या अंतर्गत शक्ती, इच्छाशक्ती आणि विपरीत परिस्थितीतून जिद्दीचा संघर्ष या कलाकृतीतून मांडण्यात आला आहे. “इंडिया के तुफान”- देशातील श्रेष्ठ बॉक्सर या व्हिडीओतून आपल्याला दिसतील. चार मिनिटांच्या या व्हिडीओतून भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील अस्सल हिरो– जगश्रेष्ठ सुवर्ण, रौप्य आणि ताम्र पदकप्राप्त लेशराम सरिता देवी, सोनिया चहल, कविता चहल, दोनदा जागतिक युवा विजेतेपद पटकावणारी नीतू घंघास आणि भारतीय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग विजेती थुलासी हेलेन सोबत तीनदा डब्ल्यूबीसी आशिया बिरूद मिळवणारा नीरज गोयत तसेच राज्य विजेता, रजत पदक प्राप्त – अमन झांगडा, ऑल इंडिया फेडरेशन कप विजेता – गगन “द पिटबुल” शर्मा, राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता, सुवर्ण आणि ताम्र पदकप्राप्त – अरबिंद कुमार प्रसाद आणि बिनोद कुमार प्रसाद तसेच पूर्व क्षेत्र राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता सुवर्ण आणि रजत पदकप्राप्त स्वयम मलिक आणि बिनीत गुरंग यांचा समावेश आहे. हा व्हीडीओ बॉक्सिंग समुदाय आणि विविध अकादमी भिवानी बॉक्सिंग क्लब (हरियाणा), सरिता रिजनल बॉक्सिंग अकॅडमी (मणिपूर), बालाजी बॉक्सिंग क्लब (कोलकाता), भोवानीपूर बॉक्सिंग असोसिएशन (कोलकाता), नजाफगरह बॉक्सिंग अकॅडमी (दिल्ली) आणि र्युको ट्रेनिंग सेंटर (लास वेगास) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता.

इथे गाणे पहाता येईल: 

सुप्रसिद्ध रॅपर डी’इव्हील उर्फ धवल परब आणि संगीत निर्माता दुब शर्मा यांनी तोडून टाक’ला जिवंत केले. तोडून टाक हे लढवय्यांना केलेले वंदन आहे आणि शोषण व त्यातून होणाऱ्या पराजयाविरोधात ‘लढण्याचे’ आवाहन आहे. जे चक्राच्या आतमध्ये लढा देऊ शकतात, त्यांना चक्राबाहेर चांगले आयुष्य मिळू शकते. आपल्या लढवय्यांचा लढा हा दडपशाही, लिंगभेद, छळ, दारिद्र्य यांच्या विरोधात आहे, स्वसंरक्षणासाठी व चांगल्या आयुष्यासाठी आहे. जे लढवय्ये जवळजवळ उद्ध्वस्त झाले होते पण पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले त्यांच्या धैर्याला सलाम करण्याचे या व्हिडिओचे ध्येय आहे. चक्राच्या आतमधील आणि बाहेरीलही. अब सही में तुफान उठेगा!

हा ऍक्शनपूर्ण आणि धुमशान घालणारा व्हिडियो अनुष्का मनचंदा व सचिन एस. पिल्लई यांनी एडीट केला असून त्यांनीच चित्रीकरण केले होते. वॉकअबाऊट फिल्म्स या सिनेमाचा निर्माता असून अनन्या दासगुप्ता कार्यकारी निर्माती आहे. या व्हीडीओची पटकथा नवझार इराणी यांची असून त्यांचेच दिग्दर्शन लाभले आहे. याची सुरूवात फरहान अख्तर याच्या तुफानी आवाजाने झाली आहे.

हेही वाचा – तुफानचा बहुप्रतिक्षित ट्रेलर झाला प्रसिद्ध !

अमेझॉन प्राईम व्हिडीओने एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या साथीने तुफान’चे सादरीकरण केले असून रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर या प्रेरणादायक खेळ-आधारित कथानकाचे निर्माते आहेत. या सिनेमात प्रमुख भूमिकेत फरहान अख्तर असून इतर कलाकारांत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ यांचा समावेश आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या सिनेमाचा जोरदार ट्रेलर स्थानिक गुंड अज्जू भाईशी भेट घडवतो. हाच अज्जू भाई पुढे अझीझ अली नावाने व्यावसायिक बॉक्सर होतो. ‘तुफान’ ही आशा, विश्वास आणि आंतरिक शक्तीला आणि जिद्द आणि महत्त्वाकांक्षेची जोड असलेली कथा आहे.

एकंदर 240 देश आणि प्रदेशांत 16 जुलै 2021 रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर एकाचवेळी हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणारा सिनेमा आहे.

 

Website | + posts

Leave a comment