आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

“Human” starring Shefali Shah, Kirti Kulhari and Vishal Jethwa will be released on Disney + Hotstar on January 14, 2022! डिज़्नी+ हॉटस्टारने 2022 च्या सुरुवातीला भारतात मानवी औषधांच्या चाचणीवर आधारित थ्रिलर ‘ह्यूमन’ लाँच करून दणक्यात सुरुवात केली आहे. या सीरीजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शाह आणि अष्टपैलू अभिनेत्री कीर्ती कुल्हारी यांच्यासह विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, संदीप कुलकर्णी, आदित्य श्रीवास्तव आणि मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सस्पेन्स थ्रिलर ‘ह्यूमन’मध्ये वैद्यकीय जगताची अनपेक्षित रहस्ये आणि खून, गूढता, वासना आणि हेराफेरी याची चित्तथरारक कथा असून त्याचे मानवी आयुष्यावर होणारे परिणाम उलगडून दाखवण्यात आले आहेत. विपुल अमृतलाल शाह आणि मोझेझ सिंग दिग्दर्शित, डिज़्नी+ हॉटस्टार विशेष मालिका मोजेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी लिहिली आहे. सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​विपुल अमृतलाल शाह निर्मित आगामी वैद्यकीय थ्रिलर नाट्य १४ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार आहे आणि ते हुलू ऍपवर देखील उपलब्ध असेल.

या मालिकेत डॉ. गौरी नाथ यांची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शेफाली शाह सांगते कि, “सीरिज म्हणून ह्यूमन ही आजच्या काळाशी संबंधित आणि अत्यंत समर्पक विषय आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मी आपल्या सध्याच्या परिस्थितीची, रुग्णालये आणि लस चाचण्यांच्या जगाची कल्पना करत होते. हे मानवतेवर आणि ते अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. गौरी नाथ अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला क्वचितच भेटली असेल. हे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात जटिल पात्रांपैकी एक आहे आणि माझ्या कम्फर्ट झोनच्या पलीकडची आहे. ती अप्रत्याशित आहे. ‘ह्युमन’ ही भावना, कृती आणि परिणामांचा पेटारा आहे आणि त्याचा गुंतागुंतीचा खोलवर कसा परिणाम होतो हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही.

अभिनेत्री शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी, अभिनित ‘ह्युमन’ 14 जानेवारी 2022 पासून डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्म्स संबंधित अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.