वास्तविक जीवनातील नायकांद्वारे प्रेरणा घेऊन काही भव्य चित्रपट निर्माण केल्यानंतर, या स्वातंत्र्यदिनी अजय देवगण बहुप्रतिक्षित युद्धपट ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर हे देखील मुख्य भूमिकेत आहे. इंडियन एअर फोर्सच्या भुज एअर बेसचे स्क्वॉड्रॉन विजय कर्णिक यांच्या शौर्याची कथा आपल्याला यात बघायला मिळणार आहे. (‘Bhuj: The Pride of India’ starring Ajay Devgn, releasing 13th August only on Disney+ Hotstar VIP)

या भव्य चित्रपटाचा ट्रेलर १२ जुलै २०२१ रोजी लाँच होणार असून आज चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. टी-सीरिज आणि अजय देवगण फिल्म्स प्रस्तुत, ‘भुज: प्राइड ऑफ इंडिया’ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीर सिंग आणि बनी संघवी यांनी केली आहे. अभिषेक दुधैया दिग्दर्शित अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शहा आणि पूजा भवोरिया हे चित्रपटाचे लेखक असून हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२१ रोजी फक्त डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होणार आहेत.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.