आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

भारतातील सणासूदीच्या धामधूमीचे आणि उत्सवाचे औचित्य साधून, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ विविध कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येत आहे. (Amazon Prime Video unveils the 2021 Festive Line-up) नर्व्ह-ब्रेकिंग थ्रिलरपासून दोन विलक्षण बायोपिक्सपर्यंत विनोदाचा एक मस्त डोस, एक चमकदार नाटक आणि काही विलक्षण आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, अशा वैविध्यपूर्ण आणि आकर्षक फेस्टिव्ह कार्यक्रमांचा संग्रह यात असणार आहे. 

पृथ्वीराज सुकुमारन ची मुख्य भुमिका असलेल्या ‘भ्रमम’ या भारतातील एक उत्कृष्ट मल्याळम थ्रिलरसह प्रारंभ करून, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ ऑक्टोबरमध्ये सर्व भाषा आणि शैलींसह भारतीय क्रांतिकारी सरदार उधम सिंह यांच्या वरील बहूप्रतिक्षित आणि विक्की कौशल याची मुख्य भुमिका असलेला ‘सरदार उधम’ या चरित्रपटाद्वारे व हिट मल्याळम हॉरर चित्रपट – एज्राचा अधिकृत रीमेक असलेल्या इम्रान हाशमि स्टारर ‘डायबूक’ या भयपटाद्वारे करत आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओची अभिनव स्टॅंड-अप मालिका ‘वन माइक स्टॅंड’च्या दुस-या सिजनमध्ये आत्तापर्यंत न ऐकलेल्या मनोरंजक गेस्ट कॉमिक्सच्या हास्याच्या खळखळाटात होणार आहे. तसेच तमिळ भाषेतील कार्यक्रमांमध्ये भर घालण्यासाठी ‘उदानपिराप्पे’ हा फॅमिलि ड्रामा, शशिकुमार आणि ज्योतिका आणि सूर्या अभिनीत मर्डर मिस्ट्रि ‘जय भीम’ कौटुंबिक पुनर्मिलनची कथा प्रदर्शित केली जाईल.

तसेच, या बिंज फेस्टमध्ये अजून बरेच काही आहे. ब्लॉकबस्टर इंडियन कार्यक्रमांव्यतिरिक्त, अमेझॉन प्राईम व्हिडीओ आपल्या प्रेक्षकांसाठी बहुप्रतिक्षित आणि बहूचर्चित आंतरराष्ट्रीय रिलीज ‘जस्टीन बीबर’ जागतिक संगीत स्टार जस्टिन बीबरच्या जीवनातील अंतर्गत गोष्टींवरील एक डॉक्युमेंट्री, टीन हॉरर ड्रामा ‘आय नो व्हॉट यु डिड लास्ट समर’, व ‘मॅराडोना- ब्लेस्ड ड्रीम’ ऑल टाईम फेव्हरीट फूटबॉलपटू डिएगो अरमांडो मॅराडोनाच्या आयुष्यावर आधारित एक विशेष मालिका, देव पटेल अभिनीत ‘द ग्रीन नाइट’, सर गवेन आणि द ग्रीन नाईटची गाथेचे रिटेलिंग असलेली मध्ययुगीन फॅंटसी घेऊन येत आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.