अमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने आज वर्षातील बहुप्रतीक्षित तुफान’च्या ट्रेलरचे प्रकाशन केले. (Amazon Prime Video released the trailer of Toofaan) अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सहकार्याने एक्सेल एन्टरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या साथीने प्रस्तुत, रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित तुफान प्रेरणादायक खेळ-कथा उलगडणार आहे.

या सिनेमात दिग्गज कलाकार सहभागी असून मुख्य भूमिकेत फरहान अख्तर (Farhan Akhtar) असणार आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ झळकणार आहेत. या सिनेमाला राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे दिग्दर्शन लाभले आहे. ‘तुफान’च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते. हा अज्जू भाई व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो.  एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रकाशित होणारी तुफान ही पहिलीच फिल्म असून 16 जुलै 2021 पासून भारतासह 240 देश आणि प्रदेशातील प्राईम मेंबरकरिता ती उपलब्ध असेल.

ट्रेलर लिंक:

आपल्या वाट्याला आलेली भूमिका आणि तिच्या तयारीविषयी बोलताना अभिनेता फरहान अख्तर म्हणाला की, “मी तुफानच्या खऱ्या अर्थाने प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीराने कितीही बळकट असली तरीही बॉक्सर असणे, हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरताना मला 8 ते 9 महिने अविश्रांत कष्ट घ्यावे लागले. बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमची कसोटी पाहणारा खेळ आहे. आम्ही घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आम्ही हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडीओसोबत सुमारे 240 देश आणि प्रदेशात घेऊन जात असल्याचा मला आनंद वाटतो.”

आपला अनुभव आणि आपण या सिनेमाला का होकार दिला हे स्पष्ट करताना सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल म्हणाला की, “एखादे प्रोजेक्ट नवीन असताना फारच आव्हानात्मक वाटते. एका बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावणे फारच आव्हानात्मक होते. एक अभिनेता म्हणून मला प्रोत्साहन मिळाले. तुफान प्रत्येक टप्प्यावर आव्हान देणारा आहे. एखाद्याने हार पत्करू नये हे सांगणारा आहे. हा एक परिपूर्ण मनोरंजनपट आहे. त्यात थरार आहे, विचार प्रवर्तक आहे आणि प्रेरणा देणारा ठरेल. राकेशने मास्टरपीस निर्माण केला आणि फरहान त्याचा ‘ए-गेम’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतो. आम्हाला तो तयार करताना मजा आली. तेव्हा प्रेक्षकांना हा सिनेमा निश्चित आवडेल अशी खात्री वाटते.”

अष्टपैलू कलाकारांसमवेत काम करताना असणाऱ्या उत्सुकतेविषयी बोलताना प्रमुख अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाली की, “राकेश ओमप्रकाश मेहरा, परेश रावल आणि फरहान अख्तर यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे. सात वर्षांपूर्वी राकेश यांनी फेसबुक मेसेज पाठवून माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे मला आठवते. आज ते प्रत्यक्षात घडते आहे. अशा रोमांचक सिनेमाचा भाग असल्याने चंद्रावर पोहोचल्याचा भास होतो. माझ्या कारकीर्दीच्या या टप्प्यावर इतक्या उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. मी याहून उत्तम किंवा प्रेरणादायी कलाकारांचा विचारच करू शकत नाही. अमेझॉन प्राईम व्हिडीओसह 240 देश आणि प्रदेशात हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे याहून उत्तम आणखी काय पाहिजे!”

कथा सारांश:
दबावाच्या परिस्थितीत डोंगरीच्या रस्त्यावर एका अनाथ मुलाचा जन्म होतो. मोठेपणी हा स्थानिक गुंड बनतो. त्याची ओळख हुशार आणि प्रेमळ तरुणी, अनन्यासोबत होते आणि जीवनच बदलून जाते. ती त्याला योग्य मार्ग दाखवते. प्रेम आणि मार्गदर्शनाच्या जोरावर हा तरुण आपले नशीब आजमावतो. एक जागतिक किर्तीचा बॉक्सर म्हणून त्याला लौकिक मिळतो. ही एक प्रेरणादायी कथा आहे. गरीबी आणि मागास परिस्थितीत पिचलेला नायक देशाचा आदर्श होतो. तो वाम मार्ग सोडतो आणि योग्य दिशा अंगीकारतो. तुफानची कथा मुंबईत आकार घेते. नायक आणि नायिकेनंतर मुंबई शहर या कथानकाची तिसरी व्यक्तिरेखा आहे. मुंबईला स्वत:चा बाज आहे, ते भारतातील बड्या शहरांपैकी एक आहे. या शहरात सर्व जाती-धर्म एक होऊन नांदतो. त्यामुळे विविध संस्कृती आणि धर्माचा हा मेल्टिंग पॉट मानला जातो. मुंबईची ही “शान” नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्या व्यक्तिरेखा सिनेमांच्या आधारे मुंबईचे दर्शन घडवताना दिसतील.

हेही वाचा – ‘तूफ़ान’ मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकुरला मिळाली मराठी भाषेत बोलण्याची संधी!

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.