आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

अमेझॉन प्राईम व्हिडिओ ने 26/11 हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर आपल्या आगामी काल्पनिक वैद्यकीय नाट्याची अमेझॉन ओरिजनल मालिका ‘मुंबई डायरीज 26/11’ चा ट्रेलर प्रदर्शित केला. (Amazon Prime Video Launched Official Trailer of Amazon Original Web Series Mumbai Diaries – 26/11) प्रसिद्ध अशा गेट वे ऑफ इंडिया इथे या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात, डॉक्टर्स आणि पोलिस कर्मचारी यांच्यासारख्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या शौर्य, निष्ठा आणि निस्वार्थी बलिदानाप्रती आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे माननीय पर्यावरण आणि शिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमेझॉन इंडिया ओरिजिनलच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक निखिल अडवाणी, निर्माते आणि मालिकेतील कलाकार यांच्या सहउपस्थितीत मुंबईच्या अत्यावश्यक सेवेतील नायकांच्या अमूल्य बलिदानाच्या स्मृती जागवणारा ‘साहस को सलाम’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

मुंबई डायरीज 26/11 हे काल्पनिक रोमांचक वैद्यकीय नाट्य आहे जे 26/11च्या भीतीदायक, अविस्मरणीय रात्री शहराच्या विरोधात रचले गेले, ज्याने एकीकडे शहर उद्धवस्त केले परंतु दुसरीकडे आपल्या लोकांची एकजूट केली आणि कोणत्याही संकटात मजबुतीने उभे राहण्याचा निश्चय दृढ केला. ही मालिका अशा घटनांचा लेखाजोखा घेते ज्या सरकारी रूग्णालयात घडतात आणि रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी तसेच अविस्मरणीय आणीबाणीच्या प्रसंगाला आणि आव्हानांना उलगडून दाखवते. ‘मुंबई डायरीज 26/11’ हा शो ९ सप्टेंबर २०२१ रोजी २४० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.

निखिल अडवाणी दिग्दर्शित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस यांनी सहदिग्दर्शित केलेली मुंबई डायरीज 26/11 हा शो, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या अप्रकाशित कथा सादर करते. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

the sparkling cast of Mumbai Diaries On Prime

महाराष्ट्राचे माननीय पर्यावरण, आणि शिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईचे स्पिरीट लवचिक आहे हे निर्विवाद आहे पण या लवचिकतेमागे आमच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या शौर्य आणि त्यागाच्या अनेक अव्यक्त कथा आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलिस, बीएमसी कामगार- हे सर्व जे खरे नायक आहेत ज्यांनी संकटाच्या काळातही शहर सुरू ठेवले. आज, ‘साहस को सलाम’ या प्रत्येक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या शौर्याचा सन्मान करणाऱ्या आणि मुंबई 26/11 मालिकेच्या झलकेचा साक्षीदार असणाऱ्या या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे. हा विषय मालिकेद्वारे येत असल्याचा आनंद आहे आणि मी या मालिकेच्या निर्मात्यांचे आणि मालिकेच्या कलाकारांचे आणि अशा शौर्य कथा जिवंत करण्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओचे अभिनंदन करू इच्छितो.”

“मुंबई डायरीज 26/11 मालिका, २६/११ च्या भयानक रात्रीविषयी एक वेगळा दृष्टीकोन देते जो आत्तापर्यंत पडद्यावर आलेला नाही,” असे दिग्दर्शक निखिल अडवाणी म्हणाले. “अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अव्यक्त नायक यांना ही श्रद्धांजली आहेच, पण ही मालिका ज्यामध्ये अष्टपैलू कलाकारांची फौज, ज्यांनी कथा जिवंत करण्यासाठी मन आणि आत्मा ओतला आहे, अशी भावनिकता आणि नाट्यमयता यांचे उत्तम मिश्रण आहे,’ ‘मुंबई डायरीज 26/11 मालिका, प्राथमिक प्रतिसादकर्त्यांच्या म्हणजे डॉक्टर, नर्सेस, इंटर्न आणि वॉर्डबॉय यांच्या दृष्टीने त्या भयानक प्रसंगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देते, मालिका प्रेक्षकांना बॉम्बे जनरल हॉस्पिटलमधील सज्ज्याच्या भागात नेते आणि त्या भयंकर रात्री तिथे काय घडले ते नाट्य उलगडते. ह्या मालिकेविषयी आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि शिष्टाचार मंत्री माननीय श्री. आदित्य ठाकरे यांनी मालिकेच्या झलक प्रदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली हा आमचा सन्मानच आहे.’ अमेझॉन प्राईम व्हिडिओमार्फत आम्ही ही कथा जगभर पोहोचवण्यात सक्षम होऊ आणि अशा वेळी जेव्हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या अथक परिश्रमासाठी प्रशंसा होणे गरजेचे आहे. या मालिकेसाठी यापेक्षा चांगले स्थान किंवा वेळ अपेक्षित करू शकले नसते.”

ट्रेलर लिंक:

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment