आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मराठी सिनेसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही मृणालने आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिनय, लेखन यासोबतच आपल्यातील दिग्दर्शनाला वाव देत तिने दिग्दर्शकाची भूमिकाही लीलया पार पाडली. मनोरंजन क्षेत्रातील अशी टॅलेन्टेड अभिनेत्री ‘प्लॅनेट मराठी’चा भाग असणाऱ्या ‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सहभागी होत आहे. (Actor Director Mrunal Kulkarni joins Planet Talent of Planet Marathi)

‘प्लॅनेट मराठी’च्या परिवाराचा भाग झाल्याबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणते, ”प्लॅनेट मराठी हे मराठी प्रेक्षकांचे हक्काचे पहिलेवहिले मराठी ओटीटी आहे. सिनेसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही त्याची जोरदार चर्चा आहे. ‘प्लॅनेट मराठी’ने अल्पावधीतच आपल्या शाखा रुंदावल्या आहेत आणि अशा परिवारात ‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी मला सामावून घेतल्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करते.”

मृणाल कुलकर्णीचा ‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सहभाग झाल्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”मृणाल कुलकर्णींचा अभिनय क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. उत्तम कलाकाराबरोबरच ती उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. साहित्याचा वारसा लाभल्याने तिला साहित्याची उत्तम जाण आहे आणि तिच्या या गोष्टीचा फायदा ‘प्लॅनेट मराठी’लाही नक्कीच होईल. अशा गुणी अभिनेत्रीचे ‘प्लॅनेट टॅलेन्ट’सोबत जोडले जाणे, हा ‘प्लॅनेट मराठी’चा बहुमान आहे.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.