– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Tu Jhoothi Main Makkaar Movie Review

कथानक थोडक्यात – दिल्लीस्थित श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा मिकी अरोरा (रणबीर कपूर) आणि त्याचा जिवलग मित्र मन्नू डबास (अनुभव सिंग बस्सी) या दोघांचा आणखी एक जोडधंदा असतो. प्रेमसंबंधांना कंटाळलेल्या तरुण-तरुणींचे हसत खेळत ब्रेक-अप्स करून देणे. आता डबास चं लग्न ठरलंय किंची (मोनिका चौधरी) सोबत जे त्याला करायचं नाहीये. त्यांच्यातील हे नातं तोडण्याची जबाबदारी तो मिकी ला देतो. डबास ने दिलेली व्यवसायिक जबाबदारी पूर्ण करतांना मिकी ची भेट होते किंची ची मैत्रीण टीन्नी मल्होत्रा (श्रद्धा कपूर) सोबत. डबास चा ब्रेक-अप राहतो दूर, आणि इकडे मिकी आणि टीन्नी चा रोमान्स सुरु होतो. मिकी आणि टीन्नी चे एकमेकांवर खूप प्रेम जरी असले तरी त्यांच्या स्वभावात एक मोठा विरोधाभास सुद्धा असतो. आणि याच विरोधाभासामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण होते. अंतर इतके निर्माण होते की दोघांचा ठरलेला साखरपुडा मोडतो आणि दोघे वेगळे होतात. आणि हो विशेष म्हणजे दोघांना वेगळे करण्याची व्यावसायिक जबाबदारी सुद्धा दुर्दैवाने मिकीवरच येऊन पडते. हे सर्व का आणि कसे होते? त्यांच्यात असा काय विरोधाभास असतो आणि यातून ते कसे बाहेर पडतात हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- कथानक आणि दिग्दर्शन. हो चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ज्या सर्व बाजू लव रंजन यांनी सांभाळल्या आहेत, त्या सर्व अफलातून आहेत. मध्यंतरापर्यंत अडखळत, संथ रस्त्याने चालणारी कथा, इंटरव्हल पॉईंट ला आलेल्या एका ट्विस्ट नंतर अशी काही गती पकडते ते अगदी अखेरपर्यंत तुम्हाला बांधून ठेवते. खासकरून चित्रपटाचा प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स हा साधारणतः शेवटचा अर्ध्या तासाचा भाग तर धमाल मजा आणतो. लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा भाग १ आणि २’ मधील खास कार्तिक आर्यन स्टाईल चे मोनोलॉग सीन्स यात अनेक आहेत जे रणबीर च्या तोंडी आहेत. हे सीन्स बघायला आणि ऐकायला आजच्या तरुणाईला मजा येईल यात शंका नाही पण त्यातील संवाद ज्या खरपूस पद्धतीने लिहिले आहेत, ते वयाच्या मर्यादा ओलांडणारे आहेत.

तुम्ही (म्हणजे तरुणाई ओलांडलेला प्रेक्षकवर्ग) जर चित्रपटाचे ट्रेलर बघून असे ठरवले असेल की ‘हा चित्रपट टिपिकल रोम-कॉम जॉनर चा आहे आणि फक्त तरुणाईलाच आवडेल असा दिसतोय, मग आपण अव्हॉइड केला तरी चालेल.’ पण नाही. असे नाहीये. आश्चर्याची बाब म्हणजे एक complete family entertainer आहे हा चित्रपट! कारण रणबीर-श्रद्धा मधील रोमान्स जसा तुम्हाला हसवतो तसेच नकळतपणे यातील कौटुंबिक दृश्ये तुम्हाला रडवतात सुद्धा. काही दृश्यात तर एकाच वेळी गालावर हसू आणि डोळ्यात आसू अशी परिस्थिती होते. खासकरून क्लायमॅक्स सीन्स मध्ये. लव रंजन यांनी ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची पुसटशी कल्पना सुद्धा येऊ दिलेली नाहीये आणि म्हणूनच मी सुद्धा वर लिहिलेल्या थोडक्यात कथानकात काहीही स्पॉईलर्स येणार नाहीत याची काळजी घेतली आहे. लव रंजन सोबत राहुल मोदी यांना सुद्धा पटकथा संवाद यांचे श्रेय जाते.

कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शनानंतर मनमुराद आनंद देणारी गोष्ट म्हणजे रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या जोडीचा कमालीचा अभिनय. श्रद्धापेक्षाही रणबीर. हँडसम आणि कमालीचा आकर्षक तर तो नेहमीच दिसतो पण यात तर क्या कहने ! तरुणींना वेड लावणारे लुक्स आहेत यात त्याचे. मिकी अरोरा अक्षरशः जगलाय हा पोरगा. रणबीरने या भूमिकेसाठी त्याला मिळणाऱ्या अवॉर्डसाठी घरात एक वेगळी गॅलरी करून घ्यावी हा सल्ला. माईंड ब्लोईंग. श्रद्धा दिसली तर छानच आहे पण तिने ज्या सहजतेने टीन्नी साकारली आहे त्याबद्दल तिचे विशेष कौतुक.

प्रीतम यांचे सुपरहिट संगीत हि आणखी एक जमेची बाजू. ‘तेरे प्यार में’ हे गाणे तर ऑलरेडी तरुणाईला आवडलेले आहेच. इतर कलाकारांमध्ये तसे तर सर्वांनीच छान काम केले आहे पण त्यातल्या त्यात अनुभव सिंग बस्सी आणि रणबीर च्या आईच्या भूमिकेत डिम्पल कपाडिया यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करावे लागेल. व्हायब्रण्ट कलरफुल छायांकन, सुश्राव्य असे पार्श्वसंगीत या इतर काही जमेच्या बाजू.

नावीन्य काय?- ओरिजिनल कथानक. कुठल्याही चित्रपटाचा रिमेक नाही ना कुठल्या चित्रपटावरून प्रेरित नाही.

कुठे कमी पडतो? – मध्यंतरापर्यंत म्हणावी तशी ग्रीप नाही. त्यामुळे फर्स्ट हाफ काहीसा डल वाटू शकतो. मध्यंतरानंतर पटकथेत एके ठिकाणी एक दोष दिसून येतो. तो इथे सांगितला तर कथानक उलगडल्यासारखे होईल म्हणून न सांगितलेले ठीक.

पहावा का?- नक्कीच. एक रिफ्रेशिंग अनुभव आहे. संपूर्ण कुटुंबासाठी.

स्टार रेटींग – ३.५ स्टार. सुपरहिट.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.