– अजिंक्य उजळंबकर

नृत्य दिग्दर्शनाकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रभुदेवा ने सलमान खान (Salman Khan) ला घेऊन काढलेला पहिला हिंदी सिनेमा ‘वॉन्टेड’ सुपरहिट होण्याच्या घटनेला आता १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या १२ वर्षात प्रभू देवाने (Prabhu Deva) अक्षय कुमार सोबत राऊडी राठोड, सिंग इज ब्लिंग, अजय देवगण सोबत ऍक्शन जॅक्सन, शाहिद कपूर सोबत आर राजकुमार व सलमान सोबत दबंग-३ हे सिनेमे दिग्दर्शित केले. हे सर्व सिनेमे ऍक्शन ला प्राधान्य देणारे तद्दन मसालापट होते ज्यात नावीन्य असे काहीच नव्हते पण तरीही सिंग इज ब्लिंग आणि ऍक्शन जॅक्सन चा अपवाद वगळता इतर सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. थोडक्यात काय तर दक्षिणेतल्या पिट्यातल्या प्रेक्षकाची नाळ लक्षात आलेल्या प्रभुदेवाने तेच प्रयोग हिंदीत केले इतकेच. काही दिवसांपूर्वी राधे (Radhe Your Most Wanted Bhai) चे ट्रेलर बघितल्यावर यातही काही नावीन्य नसणार हे अधोरेखित झाल्याने राधे बद्दल उत्सुकता शून्य होती परंतु आज अचानक समाज माध्यमांवर काही स्वयंघोषित चित्रपट तज्ञांकडून सकारात्मक प्रतिक्रिया वाचण्यात आल्या म्हणून ‘निवांत बघू यात’ असे ठरवूनही राधे त्वरित स्ट्रीम करून पहावा लागला. त्याचा हा अनुभव. (Movie Review: Radhe Your Most Wanted Bhai)

सर्वप्रथम प्रभुदेवा चे त्रिवार धन्यवाद. कारण सिनेमाची लांबी केवळ १ तास ५० मिनिटांची आहे. म्हणजे पुढे काय होणार हे माहीत असण्याचा कालावधी २ तासाहूनही कमी आहे. किती सुखद नाही? कारण पहिल्या १० मिनिटात जर तुम्हाला यात काहीही म्हणजे काहीही नावीन्य नाही हे लक्षात येत नसेल तर प्रभुदेवा सारख्या दिग्दर्शकाला तुमच्या सारख्या प्रेक्षकांचीच गरज आहे हे तुम्ही सिद्ध करता. मुंबई शहरातील ड्रग्ज रॅकेट चालविणाऱ्या खलनायक राणा (रणदीप हुडा) ला मुंबई पोलिसातील एन्काउंटर स्पेशालिस्ट राधे (सलमान खान) कसा मारतो एवढेच राधेचे कथानक. राधे आणि राणा शिवाय कथानकात  राधेच्या अवतीभोवती घुटमळणारी, गाणं आलं कि नाचणारी राधा.. सॉरी .. आय मीन दिया (दिशा पटनी) व तिचा मूर्ख (का दाखविला आहे हे शेवटपर्यंत न कळू शकणारे आपण) मोठा भाऊ अविनाश (जॅकी श्रॉफ) जो राधेचा सिनियर आहे ही दोनच पात्र आहेत. इतर सर्व पात्रे केवळ हाणामारीत वापरण्यासाठी म्हणून कथानकात पेरली गेली आहेत. म्हणून प्रभू देवाचे या १ तास ५० मिनिटांचे आभार मानावे तितके कमी आहेत. शिवाय जी सुविधा एरवी सिनेमागृहात उपलब्ध नसते ती आता मोबाईल वर सिनेमा बघतांना आपण सर्व जण वापरू शकतो याचा आनंद… ती सुविधा म्हणजे काहीही औचित्य  नसलेली गाणी १०-२० सेकंदांनी पुढे पळविण्याची. वाह. असे असेल तर असे सिनेमे फक्त ऑनलाइनच प्रदर्शित व्हावेत. 

अतिशय सुमार दर्जाच्या कथानकात, तितकीच सुमार दर्जाची गाणी म्हणजे आता उरले काय तर सलमान खान ची तीच ती ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत वाली स्टाईल’ जी आपण वॉन्टेड नंतर गेल्या १२ वर्षात किमान १२ सिनेमांमधून प्रत्येक वेळी पाहिली आहे आणि तीच ती हाणामारी. आता याचा वीट यायला लागलाय. ५५ वर्षाच्या सलमान ने आपण अजूनही तरुण आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न आता केविलवाणा होत चाललाय. एक बार मैने कमिटमेंट कर ली या संवादाची धार १२ वर्षानंतर कशी काय टिकून राहील? तेही जर तुम्ही केवळ स्वतःच्याच व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडून प्रेक्षकांना नवीन काहीच जर देणार नसाल तर? तीनही खानांमध्ये सुरुवातीपासून ते आजही केवळ आमीर हाच  प्रत्येक भूमिकेत वैविध्य टिकवून आहे. असो. जॅकी श्रॉफ सारख्या अभिनेत्याचा इतका सुमार दर्जाचा रोल देऊन कचरा का केलाय आणि त्याने तो करून का घेतलाय हे अनाकलनीय. त्यापेक्षा मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव व प्रवीण तरडे यांची (छोटीका असेना) भूमिका व काम छान आहे. २०१७ सालचा कोरियन चित्रपट ‘आउटलॉज’ चा हिंदी रिमेक म्हणजे हा राधे. सलमान ला घेऊन काहीही बनवले आणि ते ईदला प्रदर्शित केले की बक्कळ कमाई होते हा दृढ समज गेल्या काही वर्षांपासून निर्मात्या मंडळींना झालाय. पिट्यातल्या प्रेक्षकांमुळे व सलमान च्या टॉपलेस (टॉपलेस म्हणजे केवळ शर्ट लेस सलमान बघण्यासाठी काहीही सहन करणारी ब्रेनलेस मंडळी) चाहत्यांमुळे प्रत्यक्षात ते होतांनाही दिसतेय. पण यावेळी कोरोना संक्रमण काळामुळे बहुतांश थिएटर बंद आहेत. त्यामुळे यावेळी ईदला प्रदर्शित होऊन सुद्धा राधे किती चालला व खरोखर किती लोकांनी पहिला हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे.  

बाकी आपण सुज्ञ आहात. वरील लेखनप्रपंच वाचल्यावरही तुम्हाला झी5 वरील झीप्लेक्स ला २५० रु देऊन स्वतःला टॉपलेस सिद्ध करायचेच असेल तर मर्जी तुमची. 

 • IIFA 2022 will be Hosted by Bollywood superstar Salman Khan. (Image Courtesy-PR)
  १८-१९ मार्च रोजी आयफा-२०२२ चे अबुधाबी येथे आयोजन. सलमान खान करणार होस्ट
 • Movie Review Antim The Final Truth; अंतिम
 • High Octane Motion Poster of 'Antim' starring Salman Khan, Ayush Sharma released
  सलमान खान, आयुष शर्मा अभिनित 'अंतिम'चे पोस्टर प्रदर्शित; 26 नोव्हेंबरला थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित
 • Unveiling of the much awaited poster of the Salman Khan film Antim: The Final Truth
  ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या बहुप्रतीक्षित पोस्टरचे अनावरण!
 • ashwini iyer tiwari's break point
  लिएंडर पेस आणि महेश भूपति यांचा 'ब्रेक पॉइंट'मधील ‘फर्स्ट लुक’ प्रदर्शित!
 • Dial 100 | Official Trailer
 • ‘Radhe' चा हाइब्रिड रिलीज फॉरमॅट बॉलीवुडच्या डिजिटल रिलीजसाठी क्रांतीकारक ठरेल ?
 • सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'च्या टायटल ट्रॅकचे अनावरण! Radhe Your Most Wanted Bhai Title track Launched
 • "राधे: योर मोस्ट वांटेड भाई"चे नवे गाणे 'सिटी मार' प्रदर्शित; Seeti Maar from Radhe is out now..
 • Radhe: Your Most Wanted Bhai Official Trailer
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.