– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Khuda Haafiz: Chapter 2 – Agni Pariksha Movie Review. दोन वर्षांवपूर्वीचं कोवीड लॉकडाऊन जेंव्हा अंशतः अनलॉक व्हायला सुरुवात झाली पण सिनेमागृहांना परवानगी नाकारण्यात आली तेंव्हा जुलै-ऑगस्ट च्या महिन्यात बऱ्याच निर्मात्यांनी ओटीटी माध्यमावर आपले रखडलेले सिनेमे प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. अशातलाच एक सिनेमा होता खुदा हाफीज. विद्युत जमवाल या ऍक्शन हिरोचा. त्याच सिनेमाचे निर्माते आणि  दिग्दर्शक आता याचा दुसरा भाग घेऊन आले आहेत ‘खुदा हाफीझ-२ अग्नी परीक्षा’. अगदीच नावीन्य नसलेले कथानक, पुढच्या क्षणाला काय होईल याचा क्षणाक्षणाला सहज बांधता येणारा अंदाज, बटबटीत हिंसाचार आणि बिनबुडाची पटकथा यामुळे खुदा हाफीज जा हा दुसरा भाग प्रेक्षकांची अग्नी परीक्षा नक्कीच घेतो. केवळ विद्युत जमवाल या हिरोचे स्टंट्स बघायचे म्हणून जाणार असाल तर तुमचा हाफीज म्हणजे रक्षणकर्ता खुदाच असेल. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रियांची देह विक्री करणाऱ्या गॅंग च्या तावडीतून, नायक समीर चौधरी (विद्युत जमवाल) आपल्या नायिकेला म्हणजे नर्गिसला (शिवालीका ओबेरॉय) सोडवून आणतो या पहिल्या भागाच्या नंतर पुढे सरकणारे हे कथानक. नर्गिस आणि समीर आता लखनौ ला परतले आहेत. मात्र एक वर्ष होऊनही स्वतःवर झालेल्या अनेक शारीरिक अत्याचारानंतर नर्गिस अजूनही एका मोठ्ठ्या मानसिक धक्क्यात आहे आणि तिच्यावर इलाज चालू आहेत. अशा परिस्थितीत नर्गिस आई होणे धोक्याचे आहे हा सल्ला मानून, समीर त्याच्या जवळच्या मित्राच्या पाच वर्षांच्या छोट्या भाचीला, जिचे आई-वडील अपघातात मरण पावले आहेत, तिला आपल्या घरी आणतो. नंदिनी (रिद्धी शर्मा) तिचे नाव. नर्गिसला या मानसिक धक्क्यातून बाहेर आणण्यासाठी म्हणून नंदिनी ची मदत होईल अशी आशा समीर ला असते. होतेही तसेच. हळूहळू नर्गिस यातून बाहेरही येते पण दुर्दैव पुन्हा आड येते. नंदिनीच्या शाळेतील एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करत असतांना, अपहरणकर्ते त्या मुलीसोबत नंदिनी चे सुद्धा अपहरण करतात. शहरातील कुख्यात दबंग व्यक्तिमत्व असलेली ठाकूर जी (शिबा चड्ढा) हिचा अल्पवयीन नातू या अपहरणातील प्रमुख व्यक्ती असतो. दबावामुळे पोलिसांचा तपास मंदावतो आणि दुर्दैवाने त्या दरम्यान शारीरिक अत्याचार झाल्याने नंदिनी चा शेवट होतो. इथून पुढे या सर्व खलनायक मंडळींचा समीर कसा बदला घेतो हा कथाभाग. 

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कथानकात अजिबात नावीन्य नाही. एक टिपिकल चावून चावून चोथा झालेला रिव्हेंज ड्रामा यापलीकडे कथेत काहीही नाही. मध्यंतरापर्यंत तर अनेक ठिकाणी चित्रपट रेंगाळतो. मध्यंतरानंतर सुद्धा केवळ आणि केवळ विद्युत जमवाल चे ऍक्शन प्रेक्षकांना दाखवायचे आहेत या जिद्दीने दिग्दर्शक फारूक कबीर ला पछाडून टाकले आहे याची जाणीव होते. काही ऍक्शन सीन्स आणि बलात्कारानंतरचे काही सीन्स डिस्टर्बिंग आहेत. त्यात पटकथेत अनेक त्रुटी आहेत. नर्गिस चे पात्र अत्यंत सदोष लिहिलेले ती अगदीच अनाकलनीय पद्धतीने वागताना दिसते. शिवालीका ने काम ठीक केलंय. ऍक्शन शिवाय इतर कोणत्याही प्रसंगात विद्युत जमवाल फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. खलनायिकेच्या रूपात दिसणारी शिबा चड्ढा हिचा अभिनय प्रभावी झालाय पण हे पात्रही अत्यंत तकलादू वाटते. ऍक्शन दृश्ये ही खासकरून रॉ या प्रकारात मोडणारी आहेत त्यामुळे मास ऑडियन्स ला आवडतील. छायांकन छान पण गीत-संगीतात मात्र निराशा होते. 

तुम्ही जर विद्युत जमवालच्या ऍक्शन चे चाहते असाल तरच या सिनेमाच्या वाट्याला जा नाहीतर अग्नी परीक्षेला तयार रहा. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.