– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Cirkus Movie Review

चित्रपट आणि कथानक थोडक्यात – शेक्सपियरच्या सुप्रसिद्ध ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावर आधारित दोन जुळ्या भावांचे कथानक. १९६० च्या दशकातील. दोन अनाथ जुळी मुले आहेत. एक आहे रॉय (रोहित शेट्टी) आणि दुसरा जॉय (वरूण शर्मा). रॉय आणि जॉय ची एक जोडी असते उटी मध्ये तर दुसरी बँगलोर येथे. दोघांनाही आपले जुळे भाऊ सुद्धा आहेत याची अर्थातच कल्पना नसते. कथानक जसजसे पुढे सरकते, तसे या दोघांना आपल्या सोबत घडत असलेल्या विचित्र घटनांचा उलगडा होत जातो. साहजिकच रॉय या प्रमुख नायकाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन नायिका पण असणार. उटी येथील रॉय ची बायको आहे माला (पूजा हेगडे) आणि उटी येथील रॉय ची गर्लफ्रेंड असते बिंदू (जॅकवेलीन).

काय विशेष?– रोहित शेट्टी च्या आधीच्या सर्व चित्रपटांसारखीच याही चित्रपटाची प्रत्येक फ्रेम (गरजेपेक्षा जास्त) कलरफुल आहे. ६० च्या दशकातील प्रमुख कलाकारांचे गेट-अप्स आणि चित्रपटाचा एकंदरीत रेट्रो लूक बघायला छान वाटतो. संजय मिश्रा या (एकमेव) अभिनेत्याने मजा आणली आहे. संवाद काही ठिकाणी (च) खरपूस.

नावीन्य काय?– काहीच नाही. गुलजार साहेबांनी ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८२ साली संजीव कुमार व देवेन वर्मा यांना घेऊन बनविलेल्या ‘अंगूर’ चे हे पटकथेत बदल करून काढलेले २०२२ चे व्हर्जन आहे. त्यामुळे नावीन्य काहीच नाही.

कुठे कमी पडतो? – खूप ठिकाणी. अगदी खूप ठिकाणी. मुळात अगदीच प्रेडिक्टेबल अशा पटकथेची वाटचाल खूपच स्लो आहे. त्यात रोहित शेट्टी चे दिग्दर्शन सुद्धा तितकेच रटाळ. विनोद निर्मिती रोहित च्या आधीच्या सिनेमांच्या तुलनेत १०% सुद्धा होत नाही. गीत-संगीत अत्यंत सुमार दर्जाचे. रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅक्वेलिन आणि वरूण या सर्वांची कामे अत्यंत साधारण दर्जाची आहेत. त्यापेक्षा सिद्धार्थ जाधव आणि संजय मिश्रा मजा आणतात. ऍक्शन दृश्यांना पटकथेत अजिबात जागा नाही त्यामुळे रोहित च्या इतर चित्रपटांसारख्या यातही हवेत उडणाऱ्या कार दिसतील अशी अपेक्षा घेऊन जाऊ नका.

पाहावा का?– नाही. ओटीटी वर येईल तेंव्हा सुद्धा आपण एक अत्यंत साधारण दर्जाचा सिनेमा बघणार आहोत ही मानसिक तयारी करून बघा.

स्टार रेटींग – दोन तरी का द्यावेत हा प्रश्न पडला आहे. पण असो. कोवीड लॉक-डाऊन काळात आपल्या टीमला काम मिळावे या छान उद्देशाने रोहितने हा सिनेमा बनविला आहे. म्हणून दोन स्टार.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Dr.Anilkulkarni
    On December 23, 2022 5:37 pm 0Likes

    Nice review

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.