– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Beast/RAW Movie Review आधी एक प्रांजळ कबुली. दाक्षिणात्य सिनेमांना मी हलक्यात निश्चित घेत नव्हतो पण तरी एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याचा सिनेमा हिंदीत डब होऊन त्याच्या मूळ तेलगू अथवा तामिळ सिनेमाच्या दिवशीच प्रदर्शित होणारा सिनेमा त्याच दिवशी बघून त्याचा रिव्युह लिहावा या मानसिकतेत मात्र मी नक्कीच नव्हतो. ती मानसिकता आता तयार होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे बाहुबली नंतर आरआरआर ला मिळालेले यश आणि पहिल्या पार्ट च्या यशानंतर उद्या प्रदर्शित होणाऱ्या केजीएफ-२ बद्दल असलेली प्रचंड उत्सुकता आणि त्याच्या ऍडव्हान्स बुकिंग ला मिळत असलेला अभूतपूर्व रिस्पॉन्स. अमिताभच्या अग्निपथ सिनेमात टिनू आनंद अमिताभ मांडवा गावात आल्यावर आनंदाने नाचत येत त्याला विचारतो ” विजू बेटा, वो टेम (टाईम/वेळ) आ गया ना?” त्यावर अमिताभ उत्तरतो ” हां काका, टेम आ गया.. आ गया टेम!” मला वाटतं गेल्या काही वर्षांवर एक नजर टाकली तर असं स्पष्ट दिसतंय की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी म्हणजेच “टॉलिवूड का टेम आ गया”. टेम आधीही होताच पण आता या चित्रपटसृष्टीने अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा असा वेगळा आणि निश्चित प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय.  मुख्य म्हणजे हे टॉलिवूड आता बॉलीवूडला सुद्धा स्वतःच्या टर्म्स डिक्टेट करत आहे. असो. तर टेम आ गया म्हटल्यावर आपणही टेम काढून त्याला प्राधान्य दिले पाहिजे म्हणूनच आज प्रदर्शित बीस्ट (हिंदीत -रॉ ) हा अभिनेता विजय याचा सिनेमा बघण्याचा योग जुळवून आणला. 

चित्रपटाची कथा तशी एका वाक्यात सांगता येण्यासारखी. वीरा राघवन (विजय) हा एक्स रॉ ऑफिसर. चेन्नई मधील एका मोठ्या मॉल वर ताबा मिळवत पाकिस्तानी दहशतवादी आत असलेल्या लोकांना ओलीस ठेवतात आणि एका कुख्यात अतिरेक्याच्या सुटकेची मागणी करतात. आत असलेल्या लोकांमध्ये योगायोगाने वीरा राघवन पण असतो. साहजिकच टिपिकल हिरोगिरी दाखवत या होस्टेज परिस्थितीतून वीरा सर्वांची सुटका कशी करतो हा कथासार. 

नावीन्याचा अभाव असलेल्या या कथेची सारी भिस्त टिकून आहे ती केवळ विजय या अभिनेत्या भोवती असलेल्या वलयावर. त्या वलया व्यतिरिक्त नव्या दमाचा सुप्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरचे फास्ट पेस्ड, एनर्जेटिक व इलेक्ट्रीफाईंग असे पार्श्वसंगीत, केजीएफ मधील स्टंट्स साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अंबु आणि अरीवू या दोन ऍक्शन डायरेक्टर्स च्या जोडीने दिग्दर्शित केलेले जबरदस्त साहस दृश्ये आणि मनोज परमहंस यांचे सुंदर छायांकन हे तीन, रॉ अथवा बीस्ट सिनेमाचे असे डिपार्टमेंट्स आहेत जे चित्रपटाच्या तकलादू पटकथेला सावरण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. त्यात ते पूर्णपणे यशस्वी होत नाहीत हे तितकेच खरे. मध्यंतरानंतर भरकटलेल्या पटकथेला शेवटपर्यंत सूर गवसत नाही आणि अखेरीस केवळ स्टाईलिश ऍक्शन दृश्यांवर प्रेक्षकांची बोळवण होते.  मध्यंतरानंतर बऱ्याच ठिकाणी पटकथेची वाटचालही मंद होते. 

कथेतील इतर पात्रांमधील संवादांमधून काहीशी विनोदाची फोडणी देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्नही फारसा यशस्वी होतांना दिसत नाही. दमदार खलनायकाचा अभाव हा सुद्धा बीस्ट चा मोठा मायनस पॉईंट आहे. अंकुर अजित विकल यांनी साकारलेला खलनायक (दहशत निर्माण करण्यात नाही तर हास्यास्पद वाटण्यात यशस्वी झाला आहे. पटकथेत फारसे काही दाखविण्याजोगे नसतानाही दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी चित्रपटाची २ तास ३६ मिनिटांची अनावश्यक लांबी कमी का ठेवली नाही याचे कोडे सुटत नाही. नायिका म्हणून पूजा हेगडे हिला अजिबातच काही काम नाही. निव्वळ शो-पीस. विजय ने मात्र छान काम केले आहे जे त्याच्या फॅन्सला नक्कीच आवडेल. चित्रपटाची निर्मिती मूल्ये ग्रँड आहेत. 

आभाळा एवढ्या अपेक्षा असलेल्या केजीएफ-२ समोर आलेला हा ‘बीस्ट/रॉ’ विजय च्या कट्टर फॅन्स व्यतिरिक्त इतरांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.