आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

तापसी पन्नू अभिनीत ‘ब्लर’चे दिग्दर्शक अजय बहल (Director Ajay Behl) यांनी शेअर केला नैनितालमधील शूटिंग अनुभव! तापसी पन्नूने मागील महिन्यात आपले प्रोडक्शन हाउस आउटराइडर्स फिल्म्सचे अनावरण केले. जवळपास त्याच वेळी, अभिनेत्रीने मुख्य कलाकार गुलशन देवैयासोबतच्या शूटिंगसाठी नैनीतालची वाट धरली होती आणि आता, दिग्दर्शक अजय बहलने नैनीतालमध्ये शूट करण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे. (Blurr Movie Director Ajay Bahl shares his Experience of Shooting in Nainital)

अजय बहल यांनी सांगितले कि, “नैनीताल कदाचित भारतातील पर्यटकांनी गजबजलेल्या सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे. ‘ब्लर’च्या स्क्रिप्टला या अशाच लॅंडस्केपची गरज होती आणि आम्ही शूटिंगसाठी मॉल रोड आणि नैनीताल झीलसारख्या सुयोग्य जागा यासाठी निवडल्या होत्या. या दोन्ही जागा स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी गजबजलेल्या असतात आणि तापसीसारख्या लोकप्रिय कलाकारासोबत अशा वास्तविक स्थानांवर शूटिंग करणे खरोखरच आव्हानात्मक असते. मात्र इथल्या स्थानिकांनी संयम बाळगला, शूटिंग संपेपर्यंत सेल्फी घेणे किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी वाट पाहिली. मला या शहरातील लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत कि त्यांनी आमच्या या शूटिंगसाठी याला इतके सुविधाजनक बनवले.”

Blurr Movie Director Ajay Bahl shares his Experience of Shooting in Nainital

बहल पुढे म्हणाले की, ”ब्लरची टीम लोकेशनवर जास्त गर्दी असल्याकारणाने रात्री शूटिंग करत होती. नैनीताल झील आणि मॉल रोडसारख्या स्थानांवर करण्यात आलेले शूटिंग सुंदर प्राकृतिक दृश्यांचे संकेत देतात जे दर्शकांना चित्रपट बघताना नक्कीच जाणवेल.”

चित्रपट ‘ब्लर’ अजय बहलद्वारे दिग्दर्शित असून तापसी आणि गुलशन देवैया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

करमणूक जगताच्या बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.