नव्या वर्षाची सुरूवात झाली आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण दिसू लागलं. प्रत्येक जण उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. ही सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवी उमेद घेऊन आली आहे हे नक्की. नुकतीच झी स्टुडीओज निर्मित ‘पांडू’ ह्या चित्रपटाच्या शूटला मुंबई मध्ये सुरुवात झाली. विजू माने चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून चित्रपटाला उत्तम स्टारकास्ट लाभली आहे. सरलं वर्ष सगळ्यांसाठीच कठीण होतं पण आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करायला सज्ज होत आहे.

ह्या निमित्ताने झी स्टुडीओज मराठी फिल्म डिव्हिजनचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले, “२०२१ ची सकारात्मक आणि उत्साहात सुरुवात झालीये. गेली अनेक वर्षे, नवीन वर्ष आणि झी स्टुडिओजचा नवा सिनेमा हा पायंडाच आहे पण या वर्षाचा श्रीगणेशा, धमाल विनोदी आणि मनोरंजनाने भरलेल्या ‘पांडू’च्या शूटनं करतोय. २०२१ मध्ये खूप काम करायचंय, त्याचबरोबर आधी पूर्ण केलेलं कामही या वर्षात लोकांसमोर यावं, अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊनमध्ये एका सिनेमाचं शूट होऊन तो पूर्ण सुद्धा झालाय. वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट यावर्षात प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. लवकरच सिनेमाचा मोठा पडदा झळाळून उठेल हे नक्की.”

Pandu Film Slate

दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “हसणं आणि हसवणं हा सगळ्यात आरोग्यदायी उद्योग आहे असा मला नुकताच शोध लागलाय. तेव्हा यंदाचं वर्ष नव्हे तर येत्या सगळ्या वर्षात हसावणुकीचा धंदा जोमानं सुरू ठेवायचा असा विचार आहे. त्याच उद्देशाने ह्या आगामी सिनेमाचं काम सुरू केलंय. हसत राहूया, हसवत राहूया, निरोगी राहूया.  जय चार्ली चॅप्लिन, जय पु. ल. देशपांडे, जय दादा कोंडके! जय महाराष्ट्र!!!”

चित्रपटातील कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात असल्याने नक्की कोण कलाकार चित्रपटात आहेत हे पाहणे औतसुक्याचे ठरेल.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.