गेल्या वर्षीपासून या भयंकर कोरोनाविषाणूच्या जागतिक महासंकटाने मनोरंजन विश्वाला ग्रासले आहे. विषाणूची दुसरी लाट येऊन कोविड-19 च्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने आता पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीत कामकाज बंद पडलं आहे. मागील वर्षी, लॅकडाऊनच्या दरम्यान आदित्य चोप्रा यांनी सिनेसृष्टीतील हजारो रोजंदारी कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करून साह्य केले होते. भारतातील सगळ्यात मोठी निर्मिती संस्था असलेल्या यश राज फिल्म्सने पुन्हा एकदा या आव्हानात्मक काळात पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेसृष्टीतील हजारो रोजंदारी कामगारांना साह्य करण्यासाठी ‘यश चोप्रा साथी उपक्रम’ (Yash Chopra Foundation Saathi Initiative) सादर करण्यात आला आहे.

रोजंदारी कामगारांना सध्या भोगाव्या लागणाऱ्या सामाजिक-आर्थिक आणि मानवतावादी संकटांची कल्पना आदित्य चोप्रा यांना आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यश चोप्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘यश चोप्रा साथी उपक्रम’ सुरू केला जात आहे. त्यामुळे हजारो रोजंदारी कामगारांना या अडचणीच्या आणि अत्यंत अनिश्चित काळात तगून राहता येईल.

yash chopra saathi initiative

या उपक्रमाचा भाग म्हणून या फाऊंडेशनतर्फे या क्षेत्रातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात थेट 5000 रु. दिले जाणार आहेत. तसेच युथ फिड इंडिया या त्यांच्या एनजीओ भागीदारांसोबत चार सदस्यांच्या कुटुंबांसाठी संपूर्ण महिनाभर रेशन किट वाटले जाणार आहेत.

https://yashchoprafoundation.org  च्या माध्यमातून गरजूंना वायआरएफकडून तातडीने मदत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.

यश राज फिल्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी म्हणाले, “हिंदी सिनेसृष्टी आणि आमच्या 50 वर्षांच्या दैदिप्यमान प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या कामगारांना पाठबळ देण्यासाठी सातत्याने आणि अथक प्रयत्न करण्यास यश चोप्रा फाऊंडेशन बांधिल आहे. या संकटाने आपल्या इंडस्ट्रीवर, इथल्या कामगारांवरही परिणाम केला आहे. रोजगार गमावलेल्या शक्य तितक्या अधिक कामगार आणि त्यांच्या गरजू कुटुंबांना साह्य करण्याचा वायआरएफचा प्रयत्न आहे. आमच्या या क्षेत्रातील ज्या कामगारांवर जागतिक संकटाचा परिणाम झाला आहे, ज्यांना तातडीची मदत हवी आहे अशांना पाठबळ देणे हा यश चोप्रा साथी उपक्रमाचा उद्देश आहे.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.