‘वेल डन बेबी’मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका, प्रियंका तंवर यांचे दिग्दर्शन, आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर होत आहे, 9 एप्रिल 2021 पासून भारतातील प्राइम सदस्यांना या सिनेमाचे स्ट्रीमिंग करता येणार.

अमेझॉन प्राइम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा प्रीमिअर 9 एप्रिल 2021 रोजी करणार असल्याची घोषणा केली. सिनेमाचे नवे मोशन पोस्टर सादर करत ही घोषणा करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी केले आहे. पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे. यात विविध भावनांच्या मिश्रणासोबतच या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशीही वाटेल.

अमेझॉन सादर करत असलेली वेल डन बेबी ही एका खऱ्या कुटुंबावरून प्रेरित अशी हृदयस्पर्शी कथा आहे. आधुनिक जगातील एक तरुण जोडपं (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. पण, नशीबच त्यांना तो उद्देश देऊ करते. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी वेल डन बेबीची कथा अत्यंत गुंतवून ठेवणारी आहे आणि ही कथा नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकून घेईल.

अमेझॉन प्राइम व्हिडीओवर सादर होणाऱ्या या आगामी सिनेमाबद्दल अमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाच्या कंटेट विभागाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले, “गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आमच्या ग्राहकांना दुसरा मराठी डायरेक्ट-टू-स्ट्रीमिंग सिनेमा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. वेल डन बेबी ही एक साधी मात्र गुंतवून ठेवणारी कथा आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारे मनोरंजन पुरवणे आणि या सेवेत कुटुंबाला प्राधान्य देणारा कंटेंट पुरवण्यातील हा एक नवा मौल्यवान प्रयत्न आहे. भाषेपलीकडे जात विविध कथांमधून आमच्या प्रेक्षकांना सेवा देण्याच्या आमच्या उद्देशाला या नव्या सिनेमातून सुयोग्य बळकटी लाभणार आहे.”

या कौटुंबिक मनोरंजक सिनेमाबद्दल अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला, “वेल डन बेबी हा माझा प्रिय सिनेमा आहे. ही कथा मांडणे आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे हिंदोळे जिवंत करणे हा एक स्वतंत्र प्रवासच होता आणि मला आनंद आहे की अखरे अमेझॉन प्राइम व्हिडीओवर आमच्या प्रेक्षकांना ही कथा दाखवण्याचा संधी मला अखेर मिळाली.”

या सिनेमाबद्दल बहुआयामी अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली, “वेल डन बेबीची सुंदर कथा हृदयाला नक्की हात घालेल. ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल. अनेक अर्थांनी आपली वाटावी, अशी ही कथा आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून देशभरातील आमच्या चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट म्हणून हा सिनेमा सादर करताना मला फार छान वाटतंय.”

या मनोरंजक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाबद्दल दिग्दर्शक प्रियंका तंवर म्हणाली, “मराठी सिनेसृष्टीतील काही उत्तम कलाकारांसोबत काम करणं आणि एका चाचपडणाऱ्या कुटुंबाची गुंतवून ठेवणारी कथा मांडणं हा फार आनंददायक अनुभव होता. ही एक अपांरपरिक आधुनिक काळातील कथा आहे. कुटुंबातील प्रत्येक जण या सिनेमाचा आनंद घेऊ शकतो. यंदाच्या गुढीपाडव्याला प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल, त्यांचे मनोरंजन होईल याचा मला आनंद आहे.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.