प्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण (Music Director Raam-Laxman) जोडीमधील लक्ष्मण अर्थात ऊर्फ विजय पाटील (Vijay Patil) यांचे नागपूर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. (Vijay Patil, “Laxman” of duo composers “Raam-Laxman” passes away) 

विजय पाटील हे “राम-लक्ष्मण” या जोडीचे “लक्ष्मण” होते. १९७६ मध्ये राम (त्यांचे साथीदार सुरेंद्र) यांचे ‘एजंट विनोद’ हा चित्रपट साइन केल्यावर लगेचच निधन झाले. लक्ष्मण यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांत राम यांचे नाव कायम ठेवले. १९७५ मध्ये  दादा कोंडके यांनी त्यांच्या मराठी कॉमेडी ‘पांडु हवालदार’ यांचे संगीत तयार करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला.  एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले.  यानंतर अखेरपर्यंत राम-लक्ष्मण व दादा कोंडके यांची साथ सुटली नाही. राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत.  

१९८८ मध्ये राम-लक्ष्मण यांना सूरज बड़जात्याच्या ‘मैने प्यार किया’ (१९८९) द्वारे मोठा ब्रेक मिळाला. ‘हम आपके हैं कौन’ (१९९४) च्या दैदिप्यमान यशाने  राम-लक्ष्मण यांचे संगीत जगभरात गाजले. सूरज बड़जात्या यांच्या सहकार्याने त्यांच्या पुढील  त्यांनी ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाचे संगीतही खूप गाजले. राम-लक्ष्मण यांच्या अन्य लोकप्रिय चित्रपटांमध्ये तराना, एजंट विनोद, पत्थर के फूल, १०० डेज, सातवा आसमान, अनमोल, बहारों के मंजिल, मुस्कुराहट, आय लव यू, कानून, आदी  बर्‍याच चित्रपटांचा  समावेश आहे. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणा-या पुरस्काराचाही समावेश आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.