ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर (चंद्रशेखर वैद्य) यांचे आज निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी रंगविलेली, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील आर्य सुमंत (राजा दशरथाचे पंतप्रधान) या भूमिकेसाठी ते ओळखले जातात. (Veteran actor Chandrashekhar passes away at 97)

ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे आज निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत आर्य सुमंतच्या भूमिकेसाठी ते लोकप्रिय होते. आज सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. १९५४ मध्ये ‘औरत तेरी ये कहानी’ या आपल्या अभिनेता म्हणून पहिल्या भूमिकेनंतर चंद्रशेखर  जवळपास २५० हुन अधिक  चित्रपटांमध्ये झळकले.  वी. शांताराम निर्मित ‘सूरंग’ (१९५३) हा नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. गेट वे ऑफ इंडिया, फॅशन, बरसात की रात, बात एक रात की, अंगुलीमाल, रुस्तम-ए-बगदाद, किंग कोंग आणि जहां आरा यासारख्या चित्रपटांद्वारे ते लोकप्रिय झाले. सुरंग, कवि, मस्ताना, बारादारी, काली टोपी लाल रुमाल, स्ट्रीट सिंगर इत्यादी काही  चित्रपटांमध्ये चंद्रशेखर यांची प्रमुख भूमिका होती तर बसंत बहार चित्रपटात त्यांची नकारात्मक भूमिका होती. 

हेही वाचा – दम भर के लिये मेरी दुनिया में चले आओ…अभिनेता चंद्रशेखर 

त्यांनी दिग्दर्शित केलेला आणि मुख्य भूमिका असलेला ‘चा चा चा’ (१९६४) हा अभिनेत्री हेलनचा पहिला चित्रपट होय. ‘चा चा चा’ हा चित्रपट अविजित घोष यांच्या ’40 रीटेक्सः बॉलिवूड क्लासिक्स यू मे मिस’ या पुस्तकात समाविष्ट चित्रपटांपैकी एक आहे. १९६६ मध्ये त्यांनी ‘स्ट्रीट सिंगर’ हा दुसरा चित्रपट दिग्दर्शित केला. वयाच्या ५० व्या वर्षी चंद्रशेखर यांनी गुलजारचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. १९७२ ते १९७६ दरम्यान परिचय, कोशिष, अचानक, आंधी, खुशबू आणि मौसम या चित्रपटांत ते गुलजार यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते.

चंद्रशेखर यांनी १९८५ ते १९९६ दरम्यान सिने आर्टिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष (सीआयएनटीएए) म्हणून काम केले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, भारतीय सिने कलाकार कल्याण निधीचे विश्वस्त आणि सिने आर्टिस्टे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या क्षमतांमध्ये काम केले. वेलफेयर ट्रस्ट, इंडियन फिल्म डायरेक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, फिल्म राइटर्स असोसिएशन, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनचे ट्रस्टी म्हणून ते संबंधित होते.  

Website | + posts

Leave a comment