आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

“Tirsat” movie Teaser Launched; In cinemas from May 20. आयुष्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम… हे प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, त्यासाठी किती काय काय झेलावं लागतं याची थरारक गोष्ट तिरसाट या चित्रपटातून उलगडणार आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं तिरसाट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड टीजरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिरसाट हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं उधाण आलंया, फरमान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे शब्द असलेलं गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या टीजरमुळे आता चित्रपटाची आणखी चर्चा सुरू झाली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.