‘उरी:दि सर्जिकल स्ट्राईक’ सिनेमाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने उरीच्या टीमने आज त्यांच्या आगामी “दि इमॉर्टल अश्वत्थामा” या सिनेमाची घोषणा केली आहे. यात विकी कौशल प्रमुख भूमिकेत चमकणार असून दिग्दर्शनाची धुरा आदित्य धर यांनीच सांभाळली आहे व निर्मितीसुद्धा रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी फिल्म्सचीच आहे.

 

आज विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवरून या साय-फाय सिनेमाची घोषणा करताना सिनेमाचे पहिले दोन पोस्टर्स रिलीज केले आहेत. सिनेमाचे पोस्टर्स उत्कंठावर्धक असून विकी कौशलच्या चाहत्यांसाठी आज ‘उरी’ च्या दुसऱ्या वर्धापनदिनी मिळालेले एक सरप्राईज गिफ्ट आहे.  

दिग्दर्शक आदित्य धर यांनी या सिनेमाबद्दल त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की- “सुपरहिरो च्या सिनेमांना जागतिक स्तरावर नवी उंची देण्यासाठी या सिनेमात अत्यंत अद्ययावत अशा व्हिज्युअल इफेक्टस चा वापर करण्यात येणार आहे. “

The Immortal Ashwatthama movie poster

Website | + posts

Leave a comment