आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The motion poster of R Balki’s new psychological thriller Chup out now. सुप्रसिद्ध व प्रतिभाशाली दिग्दर्शक आर बाल्की यांच्या आगामी प्रकल्पाच्या घोषणेबद्दल आधीच खूप अपेक्षा असतांना आज त्यांच्या आगामी मानसशास्त्रीय थ्रिलर, चुपचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. हिंदी सिनेमाचे महान निर्माता-दिग्दर्शक गुरु दत्त यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करून बाल्की यांनी त्यांना मानवंदना दिली आहे. 

आर बाल्की यांच्या यापूर्वीच्या चित्रपट शैलीपेक्षा अत्यंत वेगळा व विरुद्ध शैलीत मोडणारा चूप हा चित्रपट असणार आहे ज्यात आर बाल्की प्रथमच हिंसक व रक्तरंजित कथाविश्वात पदार्पण करीत आहेत.

 

सनी देओल, दल्कर सलमान, श्रेया धन्वंतरी आणि पूजा भट्ट यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत. आर बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि राकेश झुनझुनवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी काम सुरू केलेल्या कथेवर आधारित हा चित्रपट स्वतः आर बाल्की यांनी लिहिला आहे. पटकथा आणि संवाद आर बाल्की, समीक्षक-लेखक राजा सेन आणि iऋषी विरमानी यांनी सहलेखन केले आहे.

The motion poster of Director R Balki's new psychological thriller Chup out now!

फोटोग्राफीचे दिग्दर्शक विशाल सिन्हा आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी आहेत. प्रणव कपाडिया आणि अनिरुद्ध शर्मा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.