आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
The Marathi film ‘Funeral’ has been selected for the 52nd Indian International Film Festival (IFFI) 2021 to be held in Goa. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गौरविल्या गेलेल्या ‘फनरल’ या आगामी मराठी चित्रपटाची नामांकित ‘इफ्फी’ महोत्सवात ही वर्णी लागली आहे.
गोव्यात होऊ घातलेल्या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२१ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश असून ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने स्थान पटकावले आहे. याआधी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव, अंबरनाथ महोत्सव, राजस्थान चित्रपट महोत्सव या महोत्सवांमध्ये ‘फनरल’ चित्रपटाची निवड झाली होती. यातल्या अंबरनाथ व राजस्थान चित्रपट महोत्सवात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत.
सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. आरोह वेलणकर, विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे, संभाजी भगत आदि मान्यवर कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच ‘फनरल’ चित्रपटाच आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतांना दिसतय.