आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Teaser poster launched for the upcoming marathi movie “Lok Kaay Mhantil?” . ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि उदाहरणार्थ निर्मित पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. “लोक काय म्हणतील?” या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लाँच करून करण्यात आली आहे.

उदाहरणार्थ निर्मित संस्थेच्या अंतर्गत “लोक काय म्हणतील” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी चिडिया, कागर अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सुश्रुत भागवत दिग्दर्शित “८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी” ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. सुश्रुत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असेही एकदा व्हावे असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या लोक काय म्हणतील या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत, तर सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा लेखन केलं आहे.

lok kaay mhantil teaser poster

चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांतून सुश्रुत यांनी उत्तम विषयांची तितकीच सकस मांडणी केली असल्यानं “”लोक काय म्हणतील?” या चित्रपटाविषयी कुतुहल आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.