अखेर सूर्यवंशी  प्रदर्शनाच्या तारखेची आज घोषणा झाली. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आज असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिनेमाचा नायक अक्षय कुमार याने आज त्याच्या ट्विटर हॅण्डल वरून आज सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. सूर्यवंशी अखेर ३० एप्रिल २०२१ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचे त्याने ट्विटरवर जाहीर केले. 

गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता परंतु लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल वर्षभर हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. दरम्यान हा सिनेमा थेट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होईल अशी  मध्यंतरी निर्माण झाली होती परंतु सिनेमाशी संबंधित व्यक्तींनी आम्ही हा सिनेमा केवळ चित्रपटगृहातच प्रदर्शित करू असे जाहीर केले. रसिकांशी दिलेला शब्द पाळत आज सिनेमाच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यात आली. 

पहा तारखेच्या घोषणेचा अधिकृत व्हिडीओ –

Website | + posts

Leave a comment