आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूराने कहर केला आहे.सोनू सूद जे आतील भागात अडकले आहेत आणि ज्यांना मूलभूत गरजा मिळत नाहीत त्यांना मदत करत आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदत पॅकेज पाठवणार आहे. (Sonu Sood Sends Out Relief Packages To People Stuck Due To Floods In Interiors Of Maharashtra.)

त्याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणतो, “ही गावे पुरामुळे खूपच प्रभावित झाली आहेत आणि ती सर्व प्रमुख महामार्गांपासून 20-30 किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तेथे मदत साहित्य पोहोचलेले नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजा जसे बादल्या,गलास, भांडी, चटई, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवले जात आहेत. कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम तेथे असेल. काही ट्रक उद्या येतील आणि आणखी काही एक दिवसानंतर येतील.

महामार्गालगत बरीच मदत सामग्री आधीच पोहचली आहे, परंतु आतील गावांना अजूनही आवश्यक गोष्टी मिळत नाहीत. सोनू आणि त्याची टीम या आतील गावांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदत साहित्य मिळणार आहे. हे मदत साहित्य संपूर्ण प्रदेशातील 1000 हून अधिक घरांना पुरवले जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक 4 दिवसात गावांमध्ये पोहोचेल.

या गावकऱ्यांना पुरेसे मदत साहित्य वितरित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून ते एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपणही प्रयत्न करू या.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.