आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Singer Bharat Ratna Lata Mangeshkar passes away गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. कोविड -१९ साठी पॉझिटिव्ह चाचणी घेतल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना सौम्य लक्षणांसह आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती हळूहळू बरी होत होती. परंतु आज सकाळी त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

लता मंगेशकर यांना प्रेमाने ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ असे संबोधले जाते. लतादीदीने वयाच्या 13 व्या वर्षी गायनात पाऊल ठेवले आणि 1942 मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले. लता मंगेशकर यांना सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कारासह डझनभर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लतादीदींच्या जाणे केवळ भारतीय संगीताची नव्हे तर संपूर्ण विश्वसंगीतसाठी कधीही भरून न निघणारी क्षती आहे 

नवरंग रुपेरी परिवारातर्फे तर्फे लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली. लता मंगेशकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह देशभरातून अनेक मान्यवरांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पुढे वाचा- स्वर संजीवनी लता मंगेशकर 

 

 

 

 

Website | + posts

Leave a comment