अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या आगामी ‘थँक गॉड’ या कॉमेडी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी फिल्मसिटीमध्ये आला असता, जेव्हा त्याला समजले की जवळच अजय देवगणही ‘मेडे’ च्या शुटिंगसाठी आला आहे तेंव्हा त्याने अजय याची सेटवर जाऊन भेट घेतली. 

याप्रसंगी सिद्धार्थने अजय देवगण सोबत दिलखुलास गप्पा मारल्या व दोघांनी आपापल्या सिनेमांविषयी चर्चा केली. ‘मेडे’ या सिनेमाचे दिग्दर्शन अजय देवगण स्वतःच करीत असून त्यात त्याची प्रमुख भूमिका सुद्धा आहे. अजयसोबत मेडे मध्ये अमिताभ बच्चन व अभिनेत्री रकूल प्रीत सिंगची प्रमुख भूमिका असणार आहे. विशेष म्हणजे इंद्र कुमार यांच्या ‘थँक गॉड’ मध्येही अजयची भूमिका असून यात अजय देवगण आणि सिद्धार्थ प्रथमच एकत्र दिसणार आहेत.  ‘थँक गॉड’ चे शूटिंग २१ जानेवारी पासून सुरु झाले असून ही टी-सीरिज फिल्म्स आणि मारुती इंटरनॅशनल ची सोबत निर्मिती असून, इंद्र कुमार हे दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

Website | + posts

Leave a comment