आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Siddharth Jadhav will host ‘Ata Hou De Dhingana’ on Star Pravah. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनी १० सप्टेंबरपासून भेटीला घेऊन येतेय असाच एक भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’. सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून तब्बल ११ वर्षांनंतर तो स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडला जातोय.

स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग म्हणता येईल. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या या नव्या कार्यक्रमातही मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येईल. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितीक लढत रंगणार आहे. पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमती या मंचावर उलगडतील.

या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ जाधव अतिशय उत्सुक असून अश्या पद्धतीच्या कार्यक्रमाची मी वाट पहात होतो असं सिद्धार्थ म्हणाला. या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. प्रेक्षकांचं वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायला मला आवडतं. आता होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम म्हणजे फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही तर यातल्या काही गोष्टी प्रेक्षकांना नवं सरप्राईज देतील. या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रवाह परिवार या शोला वेगळ्या उंचीवर नेतो. या सगळ्यांकडून नवी ऊर्जा मिळते. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय.

 चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.