आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अमेझॉन ओरिजिनल मूव्ही ‘शेरशाह’ने प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवल्यानंतर अधिकृतपणे मोठ्या लीगमध्ये प्रवेश केला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवरील हा बायोलॉजिकल युद्धपट IMDb वर सिद्धार्थ मल्होत्राचा सर्वाधिक फॅन-रेटेड चित्रपट बनला आहे. (SherShaah became the Most Popular and #1 Rated Original language film on IMDb) त्याचे युजर्स रेटिंग 10 पैकी 8.9 असून 64 हजार IMDb युजर्सनी त्यासाठी मतदान केले आहे. या आठवड्याच्या IMDbPro मूव्हीमीटर चार्टवर हा चित्रपट जागतिक स्तरावर #10 वर ट्रेंड करत आहे, ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय चित्रपटांचा क्रमांक लागतो आणि जगभरातील लाखो IMDb ग्राहकांच्या पेज व्ह्यूजवर IMDbPro डेटाद्वारे निर्धारित केला जातो.

चित्रपटाच्या यशावर भाष्य करताना, धर्मा प्रोडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता म्हणाले, “चित्रपटाला सर्व बाजूंनी मिळालेले प्रेम पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत. शेरशाह हा खरोखरच एक खास चित्रपट आणि कथा आहे, जी जगाने पाहण्याची गरज आहे. चित्रपटाचे IMDb रेटिंग प्रेक्षकांचे मिळत असलेले कौतुक आणि सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी, दिग्दर्शक विष्णू वर्धन यांची दूरदृष्टी, आमचे सहनिर्माते काश एंटरटेनमेंट आणि संपूर्ण टीम यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कलाकारांनी घेतलेली मेहनत याचे फलित आहे. कथेवर विश्वास ठेवून, आम्ही श्री बत्रा यांच्या कुटुंबाने आम्हाला त्यांची कथा सांगण्याची संधी दिली, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांची कथा आणि त्यांच्या शौर्य आणि त्यागाची अमर कथा जगासमोर आणण्यासाठी मदत केल्याबद्दल अमेझॉन प्राईम व्हिडिओचे देखील आभार व्यक्त करतो.”

आयएमडीबी इंडियाच्या प्रमुख यामिनी पाटोडिया म्हणाल्या, “भारतातील चाहते त्यांच्या आवडत्या तारे, चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आयएमडीबीला भेट देतात आणि शेरशाहच्या उच्च फॅन रेटिंगचे रेटिंग आणि पुनरावलोकन करून त्यांची आवड शेअर करतात. चित्रपट चार्ट या चित्रपटासाठी भारतातील प्रेक्षकांचा उत्साह दाखवतो आणि हे निश्चितच इतर चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये जोडण्यासाठी प्रेरित करणारे आहे.”

विष्णु वर्धन दिग्दर्शित, शेरशाह कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनापासून प्रेरित आहे आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद यांच्यासह सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘शेरशाह’ धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती असून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.