मुंबई : दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे वर्ष २०२० साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती (Dinanath Mangeshkar Award 2020) पुरस्कार आज त्यांच्या ७९ व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत.  अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर,  ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा पुरस्कार जाहीर झाला आहे. वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १ लाख ११ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

master deenanath mangeshkar award 2020
Usha Mangeshkar and Meena Khadikar
मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो.  प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. कोरोना काळामुळे सध्या कोणताही समारंभ होणार नसून हे पुरस्कार या विजेत्यांना नंतर देण्यात येतील. (sharmila tagore, prem chopra, nana patekar, honoured with master deenanath mangeshkar award 2020)
master deenanath mangeshkar award 2020
Music Director Pyarelal Sharma
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.