प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘महाभारता’त इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल (Satish Kaul) यांचे 10 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले आहे. सतीश कौल यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 74 वर्षांचे होते. ‘महाभारत’ मालिकेबरोबरच ‘आंटी नंबर १’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारखे सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. (Actor Satish Kaul dies due to COVID-19)

Actor satish kaul

सतीश कौल यांनी सुमारे 300 हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम वेताळ’ या अतिशय लोकप्रिय मालिकांमध्ये ते वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसले होते. पण सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि आर्थिक संकटामध्ये सुरु होते. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये सतीश कौल यांना लुधियानाच्या एका छोट्या घरात राहण्यास भाग पडले. दर महिन्याला त्यांना घरभाडे आणि औषधांसाठी पैसे मिळावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अडीच वर्षे रुग्णालयात राहिल्यानंतर सतीश कौल दीड वर्षे वृद्धाश्रमात राहिले.

दिलीप कुमार, देव आनंद, विनोद खन्ना यांच्या सारख्या बॉलीवूड कलाकारांसोबत त्यांनी काम केले असले तरी. त्यांना बॉलिवूडमध्ये जी प्रसिद्धी मिळाली ती पंजाबी चित्रपटांतून मिळाली.

Website | + posts

Leave a comment