आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

एका अत्यंत आकर्षक कथेची झलक सगळ्यांना दाखवावी, त्याप्रमाणे विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेल्या सरदार उधम (Sardar Udham Film) या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा टीजर अमेझॉन प्राइम व्हिडिओने लाँच केला आहे. शूजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या अमेझॉन ओरिजिनल मुव्हीची निर्मिती रॉनी लाहिरी व शील कुमार यांची आहे. ही फिल्म दसऱ्याला म्हणजेच १६ ऑक्टोबर, २०२१ रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. (Sardar Udham, starring Vicky Kaushal, will have its worldwide premiere on Amazon Prime Video on October 16)

प्रमुख व्यक्तिरेखा कष्टाने काही कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहे अशा दृश्याने टीजरची सुरुवात होते. मग कॅमेराचा फोकस पासपोर्टच्या एका गट्ट्यावर येतो- प्रत्येक पासपोर्टवर वेगळे नाव दिसते उदे सिंग, फ्रँक ब्राझिल, शेर सिंग आणि मग ‘उधम सिंग’ हे नाव समोर येते. या नावाचा पासपोर्ट गठ्ठ्यात ठेवला जातो. मग कॅमेरा झूम होतो तो सरदार उधम सिंगांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विक्री कौशलच्या फोटोवर त्याने नावे अनेक घेतली पण त्याच्या आयुष्यातील लक्ष्य एकच होते. ते म्हणजे भारतातील नृशंस हत्याकांडाचा सूड घेणे. या देशभक्ताची खिळवून टाकणारी, हलवून टाकणारी कथा सांगण्यासाठी हा टीजर व्हिडिओ उत्तम पार्श्वभूमी तयार करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आख्यायिका झालेले भारतीय क्रांतीकारक सरदार उधम सिंग यांच्या फारशा माहीत नसलेल्या गोष्टीचे कथन करणारी ही फिल्म देशवासीयांच्या मृत्यूंचा बदला घेण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या असीम धैर्याचे व ब्रिटिश साम्राज्याला हलवून टाकणाऱ्या त्या घटनेचे खोलात जाऊन दर्शन घडवते.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.