आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Sanya Malhotra and Fatima Sana Sheikh to star in RSVP’s Vicky Kaushal starrer ‘Sam Bahadur’! आरएसव्हीपी आणि मेघना गुलजारच्या आगामी ‘सॅम बहादूर’ चित्रपटात आणखी दोन कलाकारांची एन्ट्री झाली असून फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​ यात आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहेत. भारताच्या महान युद्ध नायकांपैकी एक असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित या चित्रपटातील कलाकारांबाबतची ही महत्त्वपूर्ण घोषणा दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली आहे.

मुख्य नायक सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा विक्की कौशल साकारणार असून सान्या मल्होत्रा ​​त्यांची पत्नी सिल्लूची भूमिका साकारणार आहे ज्या माणेकशॉ यांच्या आधारस्तंभ आणि शक्ती आहे. फातिमा सना शेख देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

सॅम बहादूर चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मेघना गुलजार म्हणतात, “माझ्याकडे साजरे करण्यासारखे खूप काही आहे… 1971 च्या युद्धात आपल्या लष्कराला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान आहे. सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख ‘सॅम बहादूर’च्या टीममध्ये सामील होत आहेत, हे खूप रोमांचक आहे. चित्रपटातील या दोन्ही भूमिकांमध्ये खूप संवेदनशीलता, सन्मान आणि संयम आवश्यक आहे आणि या पात्रांना जिवंत करणाऱ्या महिलांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

विकी कौशल म्हणतो, “सान्या आणि फातिमा त्यांच्या पात्रांसह सॅम बहादूरच्या कथेत अधिक व्यक्तिरेखा आणि महत्त्व आणतात आणि त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना मी खूप उत्साहित आहे. त्यांची पात्रे ही आपण ऐकलेली सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे आहेत आणि आता प्रेक्षक त्यांच्या शौर्याची आणि वचनबद्धतेची कथा पाहतील. मी त्या दोघांचेही माणेकशॉ कुटुंबात स्वागत करतो आणि आमच्या पिढीतील दोन अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करण्यास उत्सुक आहे.”

सान्या मल्होत्रा ​​म्हणते, “प्रत्येक महान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि सॅम बहादूरचा तो आधार आणि ताकद सिल्लू माणेकशॉ होती. ही भूमिका साकारताना आणि या युद्धनायकाचा त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आणि प्रभाव समोर आणण्याचा मला सन्मान वाटतो. मी मेघना गुलजारची देखील खूप आभारी आहे आणि तिच्यासोबतच्या या रोमांचक प्रवासाची मी खरोखरच वाट पाहत आहे.

फातिमा सना शेख पुढे सांगते, “सॅम बहादूर कुटुंबात सामील होऊन आणि भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि ख्यातनाम महिलांपैकी एक असलेली भूमिका बजावण्याचे आव्हान स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाद्वारे निर्माते ज्या स्मृती आणि वारशाचा सन्मान करू इच्छितात त्या मागची उत्कटता मला सर्वात जास्त उत्साही वाटते.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.